आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्माल्यापासूनच्या खतावर त्यांनी फुलवली घरात बाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा दरवळणारा सुगंध.. कदंब, तुळस, लवंग, जायफळ आणि गवती चहा या औषधी वनस्पतीचा उग्र पण हवाहवासा असा गंध आणि नेत्राकर्षक शोभेची झाडे जर घरात तसेच घराच्या अंगणात दिसली तर आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल. यासाठी मंदिरात जमा होणारे निर्माल्य आणि घरात उरलेले अन्न फेकून देण्याऐवजी त्याचा वापर सेंद्रिय खत म्हणून करण्याची आवश्यकता आहे. हाच प्रयोग उपनगर परिसरात राहणाऱ्या अश्विनी भट अाणि त्यांच्या मुलगा सस्मित भट यांनी केला अाणि घराच्या अंगणात बाग फुलवली.

इच्छामणी मंदिरातील गांधीनगर येथील मारुती मंदिरातील निर्माल्याचा बारा वर्षांपासून सेंद्रिय खत म्हणून भट कुटुंबीय वापर करीत आहेत. त्यांच्या घराच्या गच्चीवर आणि परिसरात दीडशे प्रकारच्या विविध वनस्पतींची लागवड करून त्यांनी हा परिसर सजवला आहे.

मंदिरामध्ये नारळाच्या शेंड्या, फुले, रुईची पाने आणि नैवेद्य असे निर्माल्य जमा होते. या निर्माल्याचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी वापर करता येताे. या खताचा वापर वृक्षसंवर्धनासाठी करता येताे. रुईच्या पानांमध्ये कीड नियंत्रित करण्याचा गुणधर्म असल्याने त्याचाही कीटकनाशक म्हणून वापर होऊ शकतो. पालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांच्या मदतीने निर्माल्य जमा करून घराच्या गच्चीवर आणि परिसरात ते सेंद्रिय खत तयार करतात. या खतामुळे वृक्षांची वाढ चांगल्या प्रमाणात होते. फुले, मसाले शोभेच्या वृक्षांमध्ये नैसर्गिकपणा येत असल्याने त्यांचा सुवास आणि रंग गर्द स्वरूपाचा येतो. आतापर्यंत भट यांनी कुंड्यांमध्ये कदंब, गवती चहा, ओवा, गुळवेल, बकुली, गुलाब, इन्शुलिन, अकरा प्रकारच्या तुळस, जास्वंद, मोगरा, लवंग, जायफळ, मिक्स मसाला अशी रोपे लावली अाहेत.

४५िदवसांत सेंद्रिय खत : मंदिरातूनआणलेल्या निर्माल्यापासून ४५ दिवसांत सेंद्रिय खत तयार होते. यामध्ये गांडूळ सोडल्यास उत्तम प्रकारचे खत तयार होते.

पर्यावरणप्रेमी महिलेचा वृक्षसंवर्धन मंदिरासह घरातील स्वच्छतेचा अनोखा प्रयोग; जिवामृत कीटकनाशकाचीही निर्मिती

कुंडीत खतनिर्मिती
प्रत्येकानेकुंडीमध्ये खत निर्मिती तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी. त्यानंतर कुंडीत राेप लावावे. त्यामुळे घरात उद्यान तयार होते आणि स्वच्छता राहते. -सस्मित भट, वृक्षप्रेमी

तर पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल
मी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वृक्षांना जिवामृत देऊन ते जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. निर्माल्याचे खत तयार केले तर पर्यावरणाचा ऱ्हासही होत नाही. अश्विनीभट, वृक्षप्रेमी

वृक्षवाढीसाठी हे सोपे उपाय
-फूल,फळे किंवा शोभेच्या वृक्षाला कीड लागू नये म्हणून लसूण अाणि मिरची वाटून टाकावी.
-झाडाभोवती हळद टाकल्यास कीड लागणार नाही.
-रुईची पाने कीडनियंत्रित करत असल्याने त्यांचा वापर खत म्हणून होतो.

असे तयार करावे जिवामृत
२००लिटर पाणी, १०० किलो शेण, २५ लिटर गोमूत्र, २५ किलो गूळ, २५ किलो डाळीचे पीठ, किलो मैदा यांचे एकत्रित मिश्रण करून ते हलवावे. हे मिश्रण २५ दिवस ठेवावे. त्यामुळे पूर्णपणे कीड नियंत्रित जिवामृत तयार होते. १० मिलिलिटर जिवामृतासाठी लिटर पाणी मिश्रित करून ते वनस्पतींवर फवारावे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची कीड रोग हाेत नाही.