आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन इंडिया’मध्ये सर्वांच्या सहभागाची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देशाला स्वच्छतेबरोबरच प्रगतीकडे नेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती घेतलेले गंगा स्वच्छता, स्वच्छ भारत मेक इन इंडियासारख्या अभियानात सर्वांनीच सहभागी होऊन देशाचा विकास करण्याची गरज आहे, असे आवाहन दाऊदी बोहरा समाजाचे 53 वे धर्मगुरू सय्यदना आलीकद्र मुफद्दल सैफुद्दिन साहब यांनी शनिवारी येथे केले.
द्वारका परिसरातील शंकरनगर येथील बद्री वसतिगृहाच्या प्रांगणात सय्यदना साहब यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर अशोक मुर्तडक, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार योगेश घोलप, नगरसेवक सचिन मराठे, नगरसेविका अर्चना थोरात आदी उपस्थित होते. इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर हजरत मुहंमद यांनी सांगितले आहे की, ज्या देशात तुम्ही राहतात,देशाचा विकास आणि सुरक्षतेसाठी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगत सय्यदना साहब पुुढे म्हणाले, पैगंबरांच्या मार्गावर आम्ही चालत असून, या देशाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहणार आहे. सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन हे सामाजिक सुधारणांसाठी प्रगतशील विचारांचे धर्मगुरू होते. त्यांनी आपल्या जीवनकाळात उच्च नैतिक मूल्यांची जपणूक केली. बोहरा समाजाला नवी दिशा आणि विचार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी देशाची एकात्मता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाचा कायम पुरस्कार केला. त्यांच्या प्रवचनांमधून शांतता आणि मूल्यांची शिकवण दिली जायची. समाजाच्या वैचारिक उत्थानासाठी आयुष्य वेचलेल्या डॉ. सय्यदना यांना जगभरातील अनुयायींची साथ लाभली. समाजबांधवांच्या विकासासाठी आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
‘गोदावरीसारखास्वच्छ समाज’
दाऊदीबोहरा समाज हा नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीसारखा स्वच्छ आहे. या समाजातील नागरिक जेव्हा कर्ज देतात, तेव्हा ते कोणत्याही प्रकारचे व्याज घेत नाहीत. या शांतताप्रिय समाजाचा आदर्श सर्वांनी घेण्याची गरज असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी या वेळी सांगितले.
संबंधित बातमी. ‘दिव्य सिटी’
‘मेक इन इंडिया’मध्ये सर्वांच्या सहभागाची गरज
देशाचाविकास आणि सुरक्षतेसाठी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगत सय्यदना साहब पुुढे म्हणाले, पैगंबरांच्या मार्गावर आम्ही चालत असून, या देशाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहणार आहे. सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन हे सामाजिक सुधारणांसाठी प्रगतशील विचारांचे धर्मगुरू होते. त्यांनी आपल्या जीवनकाळात उच्च नैतिक मूल्यांची जपणूक केली. बोहरा समाजाला नवी दिशा आणि विचार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी देशाची एकात्मता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाचा कायम पुरस्कार केला. त्यांच्या प्रवचनांमधून शांतता आणि मूल्यांची शिकवण दिली जायची. समाजाचे वैचारिक उत्थान आणि विश्वशांतीसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या डॉ. सय्यदना यांना जगभरातील असंख्य अनुयायींची साथ लाभली. मध्यमवर्गीय, गरीब दाऊदी बोहरा समाजबांधवांच्या विकासासाठी आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
गोदावरीसारखा स्वच्छ समाज : फरांदे
दाऊदी बोहरा समाज हा नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीसारखा स्वच्छ आहे. या समाजातील नागरिक जेव्हा कर्ज देतात, तेव्हा ते कोणत्याही प्रकारचे व्याज घेत नाहीत. या शांतताप्रिय समाजाचा आदर्श सर्वांनी घेण्याची गरज असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी या वेळी सांगितले.
देशभरातून समाजबांधव
देशातीलहजारो समाजबांधव धर्मगुरूंच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. शहराचे अमीलसाहब अदनान भाईसाहब झकिउद्दिन यांच्या मार्गदर्शनाखाली शबाब, तोलोबा, बुरहानी गार्ड‌्स, एमएसबी, जमाली बॅण्ड पथक, फैज अल मवायद आदी सामाजिक मंडळांसह शब्बीर मारू, शब्बीर मर्चंट, शेख सैफुद्दिन मद्रासवाला आदी संयोजन करीत आहेत.
धर्मगुरू सय्यदना साहब यांचे नाशकात आवाहन