आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना म्हणजे नव्याने राेजगारनिर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना म्हणजे काय, याबाबत सरकारी पातळीवरही अनेक िवभागांत संभ्रम असून, तो लवकरच दूर हाेईल. मात्र, या संकल्पनेचा सरळ अर्थ म्हणजे ‘राेजगार निर्मिती’ असा आहे. नवे उद्याेग उभे राहावेत त्यातून राेजगारनिर्मिती व्हावी, अशी यामागील व्यूहरचना असून, त्याकरिता उद्याेग, कृषी, कृषी प्रक्रिया सेवा उद्याेग, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांचा यात समावेश असून, त्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे प्रतिपादन क्लस्टर पल्स ग्लाेबल नेटवर्कचे प्रमुख जगत शहा यांनी केले.

राेड आॅन मेंटाॅर’ या उपक्रमांतर्गत नाशिक भेटीवर असलेल्या शहा यांनी महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरव्दारा आयाेजित ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमातून शहरातील उद्याेजक, तरुण, व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. या वेळी चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संताेष मंडलेचा, सचिव चंद्रकांत दीक्षित, युवा उद्याेजक समिती चेअरपर्सन नेहा खरे, नाशिकचे मेंटाॅर हेमंत सहस्त्रबुद्धे, कल्पेश लाेया, श्रीराम िसंह व्यासपीठावर हाेते.

कृषी क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा १४ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे, तर उद्याेगक्षेत्राचा वाटा गेल्या काही वर्षांपासून १५ टक्क्यांवर स्थिरावला. मात्र, सेवाक्षेत्राचा वाटा ५४ टक्क्यांपर्यंत पाेहाेचल्याकडे लक्ष वेधत नवउद्याेग, व्यवसाय उभारणीशिवाय राेजगार निर्माण हाेणार नाहीच. पण, त्यातही राेजगार िनर्मितीच्या अधिक क्षमतेचे लघुउद्याेग उभे राहणे गरजेचे असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. भारतातील तरुणांची माेठी लाेकसंख्या हे वरदान असल्याचे आपण म्हणताे. पण, त्यांना राेजगार उपलब्ध हाेऊ शकला नाही तर त्यातून निर्माण हाेणार्‍या समस्यांतून हीच तरुण लाेकसंख्या शापही ठरू शकते, याकडे शहा यांनी लक्ष वेधले.

प्रशासकीय पातळीवर वेगाने बदल
प्रशासकीयपातळीवर वेगाने बदल हाेत असून, गतिमान प्रशासकीय व्यवस्था िनर्माण हाेत आहे, भ्रष्टाचार थांबावा याकरिता इ-गव्हर्नन्स आणले जात आहे. जमिनीची उपलब्धता, सुलभ कामगार कायदे, आयात शुल्क, शिक्षण प्रणाली, सुलभ परवाना प्रक्रिया आणि गुड गव्हर्नन्सच्या िदशेने वेगाने वाटचाल सुरू असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

नाशिकला अमाप संधी...
नाशिकहा कृषिप्रधान िजल्हा असून, येथे पिकणार्‍या फळ, भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्यासाठी फूड डेव्हलपमेंट सेंटर आणि घराेघरी टाेमॅटाे पल्प बनविण्यासारख्या उद्याेगांकरिता तंत्रज्ञान उपलब्ध हाेऊ शकते, त्याची माहिती मी माझ्या अहवालात पंतप्रधानांना देणार आहे.

१८० उत्पादनांवर लक्ष केंद्रित
आपल्यादेशात आलेल्या ऊर्जा क्रांती आणि टेलिकाॅम क्रांती यांना चीनची भारतातील क्रांती म्हणावी लागेल. कारण याकरिता लागणार्‍या बहुतांश वस्तू चीनमधून आयात हाेतात. मेक इन इंडिया संकल्पनेत आयात केल्या जाणार्‍या १८० प्रमुख उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले गेले असून, या वस्तू भारतातच उत्पादित करण्यात येणार आहेत. याकरिता विकास संशाेधनावर भर देण्यासह मार्केटिंग, तंत्रज्ञान, अर्थसाहाय्य, उत्पादन यांसारख्या गाेष्टींकरिता पाेषक वातावरण तयार करण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचे शहा म्हणाले.