आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत चाखायला मिळतील ‘मेक इन इंडिया’ची फळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतीयांचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न तीन वर्षांत पूर्णत्वास येईल. त्याचा प्रत्यक्ष परिणाम चाैथ्या वर्षी पाहायला मिळेल, असा विश्वास ‘क्लस्टर पल्स’ या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचे ग्लाेबल नेटवर्क या आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेचे प्रमुख जगत शहा यांनी व्यक्त केला. ‘मेंटाॅर आॅनराेड’ या उपक्रमांतर्गत देशातील विविध शहरांना भेट देऊन उद्याेजक, व्यावसायिकांशी शहा हे चर्चा करीत आहेत. उद्याेजकांच्या समस्या जाणून त्या साेडविण्याचे उपाय सरकारी धाेरण याबाबत चर्चा करून त्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना ते देणार आहेत. नाशिकमधील उद्याेजकांशी बुधवारी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला भेट देऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी मांडलेले मुद्दे त्यांच्याच शब्दांत वाचकांसाठी...

‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना उद्याेजक, व्यावसायिकांपर्यंत पाेहाेचविण्याबराेबरच ग्रामीण भागात व्यवसाय, उद्याेग करू इच्छिणार्‍यांना मार्गदर्शन करणे ही आहे. मे राेजी अहमदाबाद येथे सुरू झालेली ही परिक्रमा ६५ िदवसांत पूर्ण हाेईल. टायर टू टायर थ्री अशा २७ शहरांतील सात हजार उद्याेजकांशी शहा संवाद साधणार आहेत.

अयशस्वी उद्याेजकांनाही साथ द्यायची गरज
आपल्याकडे उद्याेग-व्यवसायात कोणी अयशस्वी झाला की, समाज वित्तीय संस्थांचाही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकाेन चांगला नसताे. अमेरिकेत याउलट उद्याेजक अयशस्वी झालाच तर त्याच्या अपयशाची कारणे काय, याचे विश्लेषण करून त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रशिक्षण, मार्गदर्शनासह िवत्तीय संस्था त्याला मदत करतात. याप्रमाणेच आता विचार हाेत असून, गावपातळीवर यशस्वी आणि अयशस्वी झालेल्यांशी आम्ही बाेलत आहाेत, कारणे जाणून घेत असल्याचे शहा यांनी उदाहरणासह सांिगतले.

‘मेंटाॅर माॅडेल’ वर्षभर
आम्हीजाणार असलेल्या २७ शहरांत एक मेंटाॅर नेमण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली जाणार आहे. तो उद्याेगांचे प्रश्न आणि सरकारचे धाेरण यातील दुवा म्हणून काम पाहील. यातून वर्षभरात िमळणारे चांगले परिणाम पाहून, तपासूनच पुढे सर्वच पाचशे िजल्ह्यांत असे मेंटाॅर नेमले जातील.

..तर चीन काेसळेल
चीनचीअर्थव्यवस्था सरकारवर आधारित आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था उद्याेग, व्यवसायाचे प्रतिनिधित्व करत असल्याने ती मजबूत आहे. चीन सरकारने त्यांच्या अर्थव्यवस्थेतील मदतीचा हात काढला तर ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे काेसळेल. रशियासारखे चीनचे तुकडे व्हायलाही वेळ लागणार नाही, याकडे शहांनी लक्ष वेधले.

जर्मन माॅडेलची गरज
जर्मनीतबंद पडलेल्या कारखान्यांची आॅनलाइन यादी उपलब्ध करून िदली जाते. उद्याेग सुरू करण्यास इच्छुकाने केवळ ही जागा पाहिजे, अशी मागणी केल्यास तत्काळ ती उपलब्ध करून िदली जाते, तीही अगदी एक युराे सरकारला भरल्याच्या बदल्यात.