आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक इन नाशिक’ अाजपासून; फलनिष्पत्तीविषयी उत्सुकता, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद‌्घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मेक इन नाशिक’चे ब्रँडिंग सर्वच महामार्गांवर अशाप्रकारच्या हाेर्डिंग्जद्वारे करण्यात अाले. त्यामुळे या उपक्रमाविषयीची उत्सुकता वाढत अाहे. - Divya Marathi
‘मेक इन नाशिक’चे ब्रँडिंग सर्वच महामार्गांवर अशाप्रकारच्या हाेर्डिंग्जद्वारे करण्यात अाले. त्यामुळे या उपक्रमाविषयीची उत्सुकता वाढत अाहे.
नाशिक: नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या (निमा) वतीने मुंबईत अायाेजित करण्यात अालेल्या मेक इन नाशिक या दाेन दिवसीय उपक्रमाचे उद‌्घाटन मंगळवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हाेत अाहे. नाशिकचे पालकत्व स्वीकारलेले मुख्यमंत्री या उपक्रमाच्या उद‌्घाटनावेळी काय घाेषणा करतात अाणि शासनाच्या सहकार्यातून हाेणाऱ्या या उपक्रमातून नाशिकच्या पदरात काय पडते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून अाहे.
 
गेल्या सुमारे २० वर्षांत नाशिकमध्ये एकही माेठा उद्याेग अालेला नाही. येथे अाैद्याेगिक गुंतवणूक यावी, राेजगारवाढावा अाणि शहराच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने देशाची अार्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हा उपक्रम साजरा हाेत अाहे. वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये हा कार्यक्रम हाेणार अाहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, अनंत गिते, सुभाष भामरे यांच्यासह राज्याचे उद्याेगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदा अाणि वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती असेल. 
 
नाशिकमधील अाैद्याेगिक गुंतवणुकीसंदर्भातील क्षमता या उपक्रमादरम्यान मांडल्या जाणार अाहेत. देशातील टाॅप २०० कंपन्यांना यासाठी अामंत्रित केले अाहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह खासदार हेमंत गाेडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण अाणि जिल्ह्यातील अामदार, नाशिकचे महापाैर यांचीही उपस्थिती असेल. उद्याेग विभागाचे सचिव संजय सेठी अाणि विभागीय अायुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. हेही उपस्थित राहणार अाहेत. 
 
शहराचे सादरीकरण असे करणार : एकाफिल्मद्वारे नाशिकच्या क्षमता सादर केल्या जाणार अाहेत. यात सध्या येथे कार्यरत असलेल्या माेठ्या कंपन्या, राेजगाराची स्थिती, उपलब्ध कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, वातावरण यांची माहिती असेल. याशिवाय, एमअायडीसीही जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जमिनी, पायाभूत सुविधा यांचे सादरीकरण करणार अाहे. 
 
सर्वच महामार्गांवर जाेरदार ब्रँडिंग 
पुणे-मुंबईएक्स्प्रेस हायवे, मुंबई-अहमदाबाद एक्स्प्रेस वे, नाशिक-मुंबई महामार्ग या मुंबईला जाेडणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांच्या कडेला तसेच ठाणे, मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर ‘मेक इन नाशिक’चे हाेर्डिंग्ज झळकत अाहेत. या उपक्रमाबद्दलची चर्चा त्यामुळे हाेत असून उत्सुकताही वाढवित अाहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...