आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन नाशिक’ मुळे अाता विकासाला मिळणार गती, मुलगा मायकाे-महिंद्रात, लग्न लगेच जमायचं...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मेक इन नाशिक’साठी अायाेजित बैठकीत बाेलताना महापाैर रंजना भानसी. समवेत निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, नगरसेवक शशिकांत जाधव, सरचिटणीस उदय खराेटे उपक्रमाचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर. - Divya Marathi
‘मेक इन नाशिक’साठी अायाेजित बैठकीत बाेलताना महापाैर रंजना भानसी. समवेत निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, नगरसेवक शशिकांत जाधव, सरचिटणीस उदय खराेटे उपक्रमाचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर.
नाशिक - गेल्या दाेन दशकांपासून अाैद्याेगिक विकास थंडावलेल्या नाशिकच्या प्रगतीला ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमामुळे गती मिळू शकणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून शहरात माेठी अाैद्याेगिक गुंतवणूक अाणण्याची मागणी करण्याचा निर्धार साेमवारी (दि. २२) नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त झाला. 
 
निमाच्या वतीने ३० व ३१ मे राेजी मुंबईत ‘मेक इन नाशिक’ हा उपक्रम अायाेजित करण्यात अाला अाहे. या उपक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात अाली असून त्याच पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवकांची बैठक निमा हाऊसमध्ये बाेलावण्यात अाली हाेती. चार-पाच वर्षांपूर्वी ज्या वेगाने प्रगती सुरू हाेती, ती पाहता सन २०२० पर्यंत नाशिकचा अंतर्भाव मेट्राे शहरांत हाेईल, अशी स्थिती हाेती; मात्र त्यानंतरच्या काळात शहराचा विकास थांबला असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात अाले. गेल्या २० वर्षांत नवे उद्याेग अाले नाही, तसेच बांधकाम उद्याेगही थंडावला अाहे, अशी खंत काही वक्त्यांनी व्यक्त केली. यामुळे शहरात राेजगाराचा गंभीर प्रश्न भेडसावत असल्याकडे लक्ष वेधण्यात अाले. व्यासपीठावर महापाैर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सरचिटणीस उदय खराेटे, मेक इन नाशिक उपक्रमाचे चेअरमन मधुकर ब्राह्मणकर हाेते. बैठकीला नगरसेवक दीपक दाेंदे, नगरसेविका डाॅ. वर्षा भालेराव, नगरसेविका हेमलता कांडेकर यांच्यासह निमाचे माजी अध्यक्ष मनीष काेठारी, संजीव नारंग, मंगेश पाटणकर, अाशिष नहार अादी उद्याेजक उपस्थित हाेते. 

नाशिकच्या युवकांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता 
- नाशिक चेयुवक अतिशय कुशल बुद्धिमान अाहेत, मात्र येथे राेजगाराची संधी मिळत नाही किंवा मिळाली तरी वेतन खूप कमी असल्याने ते पुणे, बंगळुरूसारख्या शहरात जातात. ही स्थिती बदलायला हवी. अापल्या उद्याेजकांना अापण सक्षम करायला हवे. त्याकरीता मेक इन नाशिक हा उपक्रम लाभदायी ठरणार अाहे. शहराचा थांबलेला विकास पुन्हा गती पकडू शकताे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी करणे प्रत्येक शहरवासीयाची जबाबदारी अाहे.
- काेमल मेहराेलिया, नगरसेविका 
 
विकासासाठी पक्षविरहित काम 
- नाशिकचा विकास थांबला अाहे. ताे पुन्हा वेगाने व्हावा यासाठी पक्षविरहीत काम करण्याचे अावाहन अाहे. सर्वपक्षीय नगरसेवकांना एकत्र करतानाच ‘मेक इन नाशिक’च्या प्रसाराकरीता शहरात मी माझे सहकारी तीन नगरसेवक ४० हाेर्डिंग लावणार अाहाेत.
-दिनकर पाटील, नगरसेवक 
 
सर्वपक्षीय मिळून मागणी करू 
- ‘मेक इन नाशिक’च्या उद‌्घाटनाच्या दिवशी मुंबईत सर्वपक्षीय १२२ नगरसेवकांनी उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांकडे नाशिकचे पालक म्हणून माेठ्या अाैद्याेगिक गुंतवणुकीची मागणी करण्यासाठी सर्व नगरसेवकांना एकत्र अाणण्यासाठी प्रयत्न करणार अाहे.
- शशिकांत जाधव, नगरसेवक 
 
मुलगा मायकाे-महिंद्रात, लग्न लगेच जमायचं... 
- काही वर्षांपूर्वीमायकाे किंवा महिंद्रा कंपनीत मुलगा कामाला अाहे, म्हटलं की लगेच लग्न जमायचं; पण गेल्या १५ वर्षांत एकही माेठा उद्याेग येथे अालेला नसल्याने चांगला राेजगारच मिळत नाही. ही स्थिती बदलू शकेल असा हा ‘मेक इन नाशिक’ उपक्रम अाहे. २८ मे राेजी मुख्यमंत्री नाशिकमध्ये येत असून यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक नाशिकमध्ये माेठी अाैद्याेगिक गुंतवणूक द्यावी, अशी मागणी एकत्रितपणे करणार अाहेत. तसेच, माझ्या प्रभागातील ८० एकर जागा अायटी पार्कसाठी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार अाहे.
- रंजनाभानसी, महापाैर 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...