आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थात भाविकांना पुरेशा सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - पुण्यासह रेल्वेद्वारे येणा-या प्रवाशांसाठी शहराचे प्रवेशव्दार असलेल्या नाशिकरोड परिसरात आगामी सिंहस्थात विविध सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही प्रभाग सभापती कोमल मेहरोलिया यांनी बुधवारी दिली.

चेहडी ते नाशिकरोड, तसेच बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसर व महामार्गावर सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात विविध विभागाच्या अधिका-यांची बैठक झाली. त्यात त्या बोलत होत्या. भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
महामार्गावरून येणा-या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग, शौचालये, स्वच्छतागृह तसेच कचरा मुक्तीसाठी 24 तास घंटागाड्या, परगावच्या भाविकांच्या माहितीसाठी सूचना फलक लावले जाणार आहेत. रिक्षा-टॅक्सीचे दरपत्रक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरत्या स्वरूपातील तंबू व मंडपदेखील उभारले जातील. बिटको रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणार असल्याचेही प्रभाग सभापती कोमल मेहरोलिया यांनी या वेळी सांगितले.

शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सिंहस्थात तीन आराखडे प्रस्तावित असल्याचे उपअभियंता नीलेश साळी यांनी सांगितले.