आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा सराईत गुन्हेगारांना ‘मोक्का’, पोलिस अायुक्तालयाकडून वर्षभरातील पहिलीच कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंचवटी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना जेरबंद केलेल्या दहा सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यात अाली अाहे. पंधरा दिवसांपूर्वी या टाेळीला पंचवटी पोलिसांनी अटक केली होती. पाेलिस अायुक्तांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे संशयितांना अाता किमान सहा महिने जामीन मंजूर हाेणार नसल्याने एेन सणासुदीच्या काळात शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत हाेणार अाहे.
नवरात्रोत्सव काळात पंचवटी परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याने पंचवटी पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून गस्त घालण्यात येत हाेती. त्याचवेळी कमलनगर परिसरात संशयास्पद उभ्या असलेल्या दाेन कारमधील युवकांची चाैकशी केली असता, त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला हाेता. या टाेळीला पाठलाग करून ताब्यात घेतले असता सराईत गुन्हेगारांची टाेळी उघडकीस अाली. यात राकेश कोष्टी (रा. सिडको), जयेश हिरामण दिवे (रा. पेठफाटा), कुंदन सुरेश परदेशी, सुनील पंढरीनाथ धोत्रे , लक्ष्मण पांडुरंग जाधव उर्फ काळू (रा. गजानन चौक), गणेश भास्कर कालेकर, राकेश रामदास शेवाळे, मयूर शिवराम कानडे, परिक्षित बाळासाहेब सूर्यवंशी (सर्व रा. हनुमानवाडी, पंचवटी) यांचा समावेश अाहे. दरम्यान, पाेलिसांनी संशयितांची चाैकशी केली असता त्यांच्याविराेधात शहर परिसरात खून, प्राणघातक हल्ला, दरोडा, हाणामारी, घरफोडी, दहशत माजविणे, हत्यार बाळगणे यासारखे तब्बल २२ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी अाणि शहरात दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नाने त्यांच्याविराेधात माेक्कान्वये कारवाईचा प्रस्ताव पंचवटी पाेलिसांनी सादर केला हाेता. यावर परिमंडळ-१ च्या उपआयुक्त एन. अंबिका, निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी संशयितांवर ‘मोक्का’चा प्रस्ताव गुन्हे शाखेचे उपआयुक्त अविनाश बारगळ यांच्याकडे सादर केला हाेता. सहा. आयुक्त सचिन गोरे यांनी प्रस्तावाची छाननी करून पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांच्या परवानगीने माेक्काला संमती दिली.

कारवाईचा प्रस्ताव महासंचालकांकडे सादर
यासराईत गुन्हेगारांची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्याविरुद्ध माेक्का लावण्यात अाला अाहे. यासाठी पाेलिस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) यांच्याकडे माेक्कासाठी परवानगीकरिता प्रस्ताव सादर करण्यात अाला अाहे. त्यालाही लवकरच परवानगी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला अाहे. सचिनगोरे, सहायक आयुक्त, गुन्हे शाखा

सराईतगुन्हेगार रडारवर
मोक्काकारवाईसाठी आणखी पाच सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्हे शाखेकडून या संशयितांची गोपनीय चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.