आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थात मालधक्का तीन महिने बंद, उद्योगांना फटका रेल्वे प्रशासनाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड - सिंहस्थकाळात नाशिकरोड येथून रेल्वेगाड्या सोडण्यासाठी मालधक्क्यावरील ट्रॅकचा वापर करण्यात येणार असल्याने जुलै ते सप्टेंबरपर्यंत अर्धा मालधक्का बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे उद्योगांना लागणारा कच्चा माल, बांधकामासाठी लागणारे स्टील सिमेंट याची शहरात कृत्रिम टंचाई निर्माण होणार असून, त्यामुळे उद्योग-व्यवसायाचे नुकसान होणार आहे.
वेअर हाऊसच्या ताब्यातील अर्धा मालधक्का ऐन पावसाळ्यात बंद राहाणार असल्याने खतांची आवक कमी होऊन त्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. वेअर हाऊसचा मालधक्का बंदच्या निर्णयाचे पत्र रेल्वे प्रशासनाला पाठवले, मात्र वेअर हाऊसचे व्यवस्थापक दौऱ्यावर असल्याने पत्र सार्वजनिक करण्यात आले नाही. मालधक्क्यावरील वेअर हाऊसच्या ट्रॅकवरून सिंहस्थात नाशिकरोड येथून प्रवासी रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. तेथील शेडचा उपयोग प्रतीक्षालय म्हणून केला जाणार आहे.

तीन महिने वेअर हाऊस बंद ठेवण्याच्या निर्णयावर वेअर हाऊसने रेल्वेकडे महिन्याला २६ लाख याप्रमाणे तीन महिन्यांचे ७८ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. रेल्वेने ती फेटाळली आहे. मालधक्क्यावर एकूण चार ट्रॅक असून, एका ट्रॅकवर वेअर हाऊसचे वॅगन खाली होतात. दोन ट्रॅकवर मालधक्क्याच्या वॅगन, तर चौथ्या ट्रॅकचा वापर लोखंडी साहित्य खाली करण्यासाठी होतो. माथाडी वेअर हाऊस अशा दोन्ही ठिकाणी १४०० कामगार आहेत. मालधक्का बंद ठेवल्यास या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. वेअर हाऊसच्या ट्रॅकवर सिमेंट खतांचे महिन्याला ४५ रॅक येतात. एका रॅकला ४२ ते ५८ वॅगन असतात. एका वॅगनची क्षमता ६७ ते ७० टनांची असते.

निर्णयाची माहिती नाही

रेल्वेने वेअर हाऊसचा मालधक्का बंदचा निर्णय घेतल्याची अधिकृत माहिती नाही. पत्र प्राप्त झाल्यानंतर भूमिका ठरवू. - सुनील यादव, महाराष्ट्र माथाडी, ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन

मागणीचा फेरविचार करावा

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिंहस्थात मालधक्का बंद ठेवणार असल्याचे आश्वासन देऊन पाळले नाही. या निर्णयाचा फेरविचार करावा. -सुनील वाघ, मार्गदर्शक, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन

कंत्राटी नेमणुकीची मागणी

माल धक्काबंदच्या निर्णयामुळे सात हजार कामगार बेरोजगार होणार असल्याने सिंहस्थात कंत्राटी कामगार म्हणून भरतीसाठी कामगार उपायुक्तांकडे आग्रह धरणार आहे. रामबाबापठारे, अध्यक्ष, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन

पर्यायी व्यवस्थेची मागणी

पर्यायी धक्का पाडळी स्थानकावर उभारावा, अशी मागणी ‘निमा’ने दोन वर्षांपूर्वीच केली होती. ओढ्याचाही पर्याय चांगला आहे.सिंहस्थात मालधक्का बंद करता पर्यायी व्यवस्था या दोनपैकी एका ठिकाणी करण्याची पुन्हा मागणी करू. -मंगेश पाटणकर, सरचिटणीस, निमा

बांधकामास फटका

मालधक्क्यावर प्रतिदिन ६० हजार बॅग्ज इतके सिमेंट उतरविले जाते. मालधक्का बंद केला तर हा माल ट्रकमधून शहरात आणावा लागेल. यामुळे सिमेंटच्या कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागेल. याचा फटका बांधकाम उद्योगाला बसणार असल्याचे सिमेंट असोसिएशनने स्पष्ट केले.

ट्रकद्वारे आणावा लागेल माल

सिंहस्थाततीन महिने मालधक्का बंद ठेवल्यास उद्योगांचा कच्चा माल, तर बांधकामासाठी लागणारे स्टील सिमेंट यांची कृत्रिम टंचाईची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय ट्रक, ट्रेलरद्वारे हा माल शहरात आणावा लागेल. ट्रान्सपोर्टचा अतिरिक्त खर्च ग्राहकांच्या माथी पडेल.