आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसर प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश : राम शिंदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या हत्येचा कट सोने लूट प्रकरणातील संशयितांनी नाशिकरोड कारागृहात रचल्याची माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. संशयितांवर संबंधित पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याचेही आदेश त्यांनी दिले.

विशेष मोक्का न्यायालयाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुंबई व नाशिक पोलिसांच्या तपासात नाशिकरोड कारागृहातून हा कट रचल्याचे निष्पन्न झाले. अजय मिसर यांना धमकीचे पत्र वरिष्ठ अधिकार्‍यांना प्राप्त झाले आहे. मीरा बोरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नाशिकरोड कारागृहातून फोनद्वारे धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. सोने लूट प्रकरणातील काही संशयित कारागृहात आहेत. यातील संशयितांनी हा कट रचल्याचा दुजोरा गृहमंत्री राम शिंदे यांनी दिला.