आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावला गुन्हेगार अल्ताफ टकल्याचा खून, कानाखाली बंदूक ठेवून घातली गाेळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - शहरातील विविध पाेलिस ठाण्यांमध्ये घरफाेडी, खुनाचा प्रयत्न, खंडणी वसुली, घरफाेड्या अशा गुन्ह्यांमध्ये संशयित असलेला कुख्यात गुंड अल्ताफ बेग मुश्ताक बेग ऊर्फ अल्ताफ टकल्या याचा अज्ञात हल्लेखाेरांनी डाेक्यात गाेळी घालून खून केला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुशावरत चाैकात हा प्रकार झाला. या प्रकरणी पाेलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले अाहे.

अल्ताफ टकल्याचा भाऊ अश्पाक बेग याने शहर पाेलिस ठाण्यात फिर्याद िदली अाहे. अल्ताफ टकल्या हा मुशावरत चाैकातील राही डाबी या दुकारासमाेर उभा असताना माेटारसायकलवरून अालेल्या दाेघा अज्ञात हल्लेखाेरांनी त्याच्या जवळ येत त्याच्या कानाखाली बंदूक ठेवून गाेळी घातली. यानंतर हल्लेखाेर फरार झाले. याचवेळी अल्ताफ टकल्या काेसळला गतप्राण झाला. या प्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. शहर पाेलिसांनी चार संशयितांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले अाहे.