आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिकेच्या विनयभंगानंतर मालेगावात जमावाचा उद्रेक, अफवा पसरल्याने उद्रेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - शाळेतीलसफाई कर्मचाऱ्याने पाच वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यामुळे संतापलेल्या पालक जमावाने शुक्रवारी सकाळी मालेगावातील मदर अायेशा प्रायमरी हायस्कूलवर हल्ला चढविला. शाळेच्या ग्रंथालयासह फर्निचरही जाळून टाकले. त्यांना राेखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाेलिसांवर दगडफेक करत त्यांची वाहने जाळली.या दगडफेकीत १२ जण जखमी झाले अाहेत.
अजय दणके या सफाई कर्मचाऱ्याने बुधवारी अापला विनयभंग केल्याची तक्रार विद्यार्थिनीने पालकांकडे केल्यानंतर पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार करुन दणकेला कामावरुन काढून टाकण्याची मागणी केली हाेती. मात्र, शाळेने त्याकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी पालक काही नागरिकांनी मुख्याध्यापक शिक्षकांना याबाबत जाब विचारला. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी इतरांनाही शाळेत बाेलावून घेतले. जमाव वाढत असल्याने शाळेच्या कर्मचाऱ्यांनी पाेलिसांना बाेलावले. पाेलिसांनी प्रयत्न करूनही जमाव शांत झाला नाही. जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘अाराेपीला अामच्या ताब्यात द्या’ अशी मागणी जमावाकडून हाेत हाेती. याचवेळी माजी अामदार रशीद शेख, एमअायएमचे नेते अब्दूल मलिक शाळेत दाखल झाले. त्यांनीही जमावाची समूजत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेला जातीय, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याने जमावातील काही जणांनी शेख यांच्यावर दगडफेक केली.
तीन शिक्षक पाेलिसांना शाळेत डांबून ठेवले. बाहेर काही जणांनी पाेलिसांवर दगडफेक सुरू केली. अज्ञात लाेकांनी पाेलिसांची जीप इतरांच्या तीन दुचाकी पेटवून दिल्या, शाळेच्या इमारतीलाही अाग लावली. दरम्यान, पाेलिसांनी तातडीने जादा फाैजफाटा तैनात करुन जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.
जमावाने शाळेचे फर्निचर इमारतीबाहेर काढून पेटवून दिले.
पीडित विद्यार्थीचा मृत्यू झाल्याची अफवा पसरविण्यात अाल्याने हा उद्रेक झाला. मात्र ही विद्यार्थीनी सुखरूप असून संशयित अाराेपी फरार असल्याने त्याचा शाेध सुरू करण्यात अाला अाहे. त्याला लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक संजय माेहिते यांनी दिली.