आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव दंगल; पोलिसांकडून दहा हजार जणांवर गुन्हे दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - अायेशानगर येथील खातून मायनाॅरिटी एज्युकेशन साेसायटीचे मुख्यालय विद्याशाखा इमारतीची जाळपाेळ, पाेलिस वाहनांची मोडतोड, दगडफेक तसेच दंगलप्रकरणी दहा हजार संशयितांविरुद्ध रमजानपुरा ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात अाले असून ितघांना अटक झाली आहे.
बुधवारी शाळेच्या स्वच्छतागृहाची सफाई करण्यासाठी अालेल्या कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या पालकांनी केली. हा प्रकार कळताच स्थानिक नागरिक संतप्त झाले. शुक्रवारी हजारांेच्या संतप्त जमावाने शाळेवर चाल करत जाळपाेळ केली हाेती. दगडफेक करत पाेलिसांच्या पाच वाहनांना अाग लावली. याप्रकरणी पाेलिसांनी दिलशाद अहमद अशरफ अली जलिस अहमद खालिद अख्तर, अल्ताफ अहमद मुश्ताक अहमद यांना शनिवारी अटक करण्यात अाली.
याप्रकरणी सहायक पाेलिस िनरीक्षक सतीश गावित यांनी शुक्रवारी रात्री दहा हजार संशयितांविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला. अटक करण्यात अालेल्या तीन संशयितांबराेबरच अाशिक काल्या इम्रान चांद्या (व्हिडिअाेवाला), रिजवान इम्तियाज, इस्माईल नकट्या, हमीद डबा यांच्यासह दहा हजार अनाेळखी जमावाविरोधात फिर्याद िदली अाहे.‘खातून डी. एड. काॅलेज बंद कराे, यहाँ बहाेत लफडेबाजी चलती है,यहाँ के लाेग लडकियाें काे सताते है’ असे म्हणून इमारतीवर दगडफेक केली. तसेच इमारतीच्या साहित्याला अाग लावून िदली. याच वेळी बंदाेबस्तावर असलेल्या पाेलिस अधिकारी कर्मचारी यांच्यावर दगडफेक करून त्यांना जखमी केले. दरम्यान, शुक्रवारी दुपारी च्या सुमारास देवीचा मळा भागात मालेगावकडे येणाऱ्या बसवर जमावाने दगडफेक केली. प्रवासी जखमी झाले. बसचालक अनिल यशवंत गांगुर्डे यांच्या तक्रारीनंतर दाेनशे जणांविरुद्ध फिर्याद िदली अाहे.
जाळपोळीत पन्नास लाखांचे नुकसान
खातून संस्था इमारत जाळपाेळीत संस्थेचे पन्नास लाखांचे नुकसान झाल्याचा दावा संचालक िरजवान मुतल्लिक शेख यांनी केला अाहे. या घटनेमागे राजकारण हाेत आहे. याची सखाेल चाैकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली अाहे.
विनयभंगप्रकरणी संशयिताला काेठडी
खातून संस्थेत मदर अायेशा स्कूलच्या स्वच्छतागृहात पाचवर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी अजय छगन दणके (रा. मालेगाव) याला शुक्रवारी रात्री लासलगाव येथून अटक करण्यात अाली. शनिवारी त्याला न्यायालयात उभे केले असता दाेन िदवस पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.