आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव : खून करून तरुणीचा मृतदेह पेटवून दिला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - प्राणघातक हल्ला करून 18 ते 20 वर्षे वयोगटातील एका तरुणीचा अज्ञात हल्लेखोरांनी खून केला असून, तिचा मृतदेह पेटवून दिल्याची घटना मालेगाव तालुक्यातील शेंदुर्णी फाट्यावर रविवारी उघडकीस आली. तरुणीची ओळख पटली नसून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तरुणीचा मृतदेह जळत असल्याचे एका निनावी फोनद्वारे सकाळी 8 वाजता पोलिसांना कळाले. चाळीसगाव फाट्यावर बंदोबस्तास असलेले पोलिस तत्काळ घटनास्थळी गेले. तोवर तरुणीच्या शरीराचा कोळसा झाला होता. मृतदेह धुळ्याच्या शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. मृतदेह 80 टक्के भाजलेला आहे. सलवार-कमीज परिधान केलेल्या तरुणीच्या चेहर्‍यावर शस्त्राचे वार दिसून आले. शरीर पूर्णपणे जळाल्याने तिची ओळख पटू शकली नाही. पेट्रोल टाकून हा मृतदेह पेटवून देण्यात आला असावा, असे पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी सांगितले.