आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावात पाणी टंचाईचा बळी; विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वळवाडी ता. मालेगाव येथे पाणी भरण्यासाठी गेलेल्या राहुल मांगू पाटील या पंधरा वर्षीय मुलाचा सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. गेल्या वर्षीही येथील रखमाबाई सोनवणे या महिलेचा पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असता विहिरीत मृत्यू झाला होता. आज सकाळी आठ वाजे दरम्यान ही घटना घडली. वळवाडे येथील पाणी टंचाईचा हा दुसरा बळी आहे. 
 
गेल्या चाळीस वर्षांपासून हे गाव पाणी टंचाईचा सामना करीत आहे. वळवाडी व परिसरातील गावांसाठीची नऊ गाव पाणी पुरवठा योजनाही कुचकामी ठरल्याने हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. सततची पाणी टंचाई व शासनाचे उदासीन धोरण अजून किती बळी घेईल असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...