आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malegoan Dabhadi Congress Vs Shiv Sena Jp Election

दाभाडीत कॉँग्रेसपुढे शिवसेनेचे आव्हान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव: तालुक्यातील प्रमुख दावेदार पक्ष असलेल्या शिवसेनेला सातत्याने दाभाडी गटाबाहेर ठेवणार्‍या कॉँग्रेसला आगामी निवडणूक आव्हानात्मक आहे.
गेल्या दहा वर्षाच्या राजकीय सत्ताकाळात पंचायत समिती आपल्या ताब्यात ठेवत जिल्हा परिषदेतही निम्म्यापेक्षा अधिक सदस्य पाठविणार्‍या शिवसेनेला मात्र, दाभाडी गटात पाय रोवता आले नाहीत. कॉँग्रेस व सर्मथकांनीच प्रत्येक निवडणुकीत बाजी मारत आपला उमेदवार जिल्हा परिषदेत पाठविला आहे. परंतु गेल्या काही काळात बदललेली राजकीय समीकरणे परिणामी राष्ट्रीय पक्षांची घटलेली ताकद, नव्याने उदयास आलेल्या आघाड्या, मित्रपक्षांमधील गटबाजी या स्थित्यंतरात शिवसेनेने पक्षांतर्गत राखलेले संघटन पाहता कॉँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. दाभाडी मतदार संघातून निवडून गेलेल्या कॉँग्रेस नेत्यांनी काही काळ जिल्हय़ाचे पालकमंत्रीपदही भूषविले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दाभाडी गट अनुसूचित जमात महिला राखीव होता. या गटातून कॉँग्रेसच्या निरोत्तमा अहिरे यांना सहा हजार 677 मते पडून त्या विजयी झाल्या होत्या तर राष्ट्रवादीच्या छबाबाई अहिरे यांना एक हजार 95 मते पडून त्या दुसर्‍या क्रमांकावर होत्या. आगामी निवडणुकीत हा गट इतर मागासवर्गीय पुरुष राखीव झाला आहे. गटाच्या रचनेतही फेरबदल झाले असून, आघार गण ऐवजी पाटणे गणाचा दाभाडीत समावेश करण्यात आला आहे. दाभाडी गटात सर्वच पक्षांचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव आहे. गटातून उमेदवार कुणीही दिला, तरी निवडून देण्याची निर्णायक मतसंख्या एकट्या दाभाडीकडे आहे. अर्थात निव्वळ दाभाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात 13 हजारपेक्षा अधिक मतदार आहेत. गटाची बदलेली रचना, बदलते राजकीय समीकरणे व इतर मागासवर्गीय पुरुषांसाठी राखीव या गटात मातब्बर इच्छुकांमध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे वर्चस्वाचा सामना दाभाडी गटात पहायला मिळणार आहे.