आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्याविष्काराने रंगला मल्हार महोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उत्तर महाराष्ट्र स्तरावर घेण्यात आलेल्या ‘अपूर्व सूर मल्हार २०१४’ महोत्सवाच्या ऑडिशनला नाशिकमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. "हिची चाल तुरूतुरू, माउली-माउली अशा नवीन-जुन्या सुरेल गीतांची मैफल अन् लोकप्रिय गीतांवर कलाकारांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याविष्काराने सर्वांचे लक्ष वेधत मल्हार महोत्सवात रंग भरले.

प्राथमिक नविड फेरीतून लहान व मोठ्या गटातून गायन स्पर्धेत १६ तसेच नृत्य स्पर्धेत १० स्पर्धकांची नविड झाली. उपांत्य फेरी मालेगाव येथील आर.बी.एच. कन्या विद्यालयात होईल. सन २००८ पासून मालेगावस्तरावर सुरू झालेला ‘अपूर्व सूर मल्हार’ हा महोत्सव तालुका आणि जिल्हास्तरावर घेण्यात येतो. यंदाच्या वर्षापासून प्रथमच हा महोत्सव उत्तर महाराष्ट्र स्तरावर आयोजित केला आहे. कलाकारांना सृजनशीलता अभवि्यक्त करता यावी, या उद्देशाने दोन वयोगटात वैयक्तिक गायन व नृत्य स्पर्धा नविड फेरी नाशकातील के.बी.एच. दंत महाविद्यालयात झाली.

उद‌्घाटन माजी महापौर बाळासाहेब सानप, नगरसेविका रंजना भानसी यांच्या हस्ते झाले. या वेळी महोत्सवाच्या संयोजिका संपदा हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिरचे सहसचवि प्रा. व्ही. एस. मोरे, प्रा. प्रशांत सूर्यवंशी, परीक्षक अमित भावसार, शंकर महाजन आदी उपस्थित होते.
नाशकात झालेल्या या प्राथमिक नविड फेरीला शहर व परिसरातील कलाकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपांत्य फेरी ३ सप्टेंबर रोजी होणार
प्राथमिक फेरीतून गायनात १६, तर नृत्यात १० स्पर्धकांची नविड झाली. सहभागी होता न आलेल्यांची २ सप्टेंबरला आर.बी.एच. कन्या विद्यालयात पुन्हा फेरी होईल. मालेगाव येथील आर.बी.एच. कन्या विद्यालयात ३ सप्टेंबर रोजी उपांत्य फेरी होईल. गायनासाठी शंकर महाजन, तर नृत्यासाठी अमित भावसार परीक्षक होते. ललित बेडेकर, विशाल बेडेकर, दीपक सोनवणे, संजय शिंदे, शशी पवार, नरेंद्र खैरनार यांनी संगीत साथ दिली.