आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिटरेचटर फेस्‍टीव्‍हल: साधी उडी ते अाकर्ण धनुरासनपर्यंत, उलगडला मलखांबचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधी उडी, बगली, उल्टी अढी, तबकफाड, पादहस्तासन, मत्स्यासन, बजरंगासन, खांदी, पश्चिमाेत्तासन, झाप, एकपाद शिरासन, नाैकायन ते अाकर्ण धनुरासन अशी मल्लखांबमधील एकाहून एक सरस अासनांची प्रात्यक्षिके दाखवत अन मलखांबचा पूर्ण इतिहास उलगडून दाखवत ‘मलखांब : भारतीय खेळांचा अस्सल नमुना’ हा कार्यक्रम नाशिककर क्रीडाप्रेमी नागरिकांच्या डाेळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

मुंबईच्या समर्थ व्यायामशाळेचे ज्येष्ठ  या दृष्टांतानुसार मलखांब या खेळाचा प्रारंभ झाल्याचे देशपांडे यांनी नमूद केले. त्यामुळे या नाशिक जिल्ह्यातच खेळाचा उगम झाला असून, ताे अाता भारतातील २९ राज्यांमध्ये अधिकृत मलखांब संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हाेताेे, असे देशपांडे यांनी नमूद केले.

अंध मुला-मुलींना अात्मविश्वासाचे बळ : डाेळस मुला-मुलींना शिकवतानाच काही अंध मुला-मुलींशी संपर्क अाल्यावर त्यांनादेखील हा खेळ शिकवता येईल, असे वाटल्याने त्यांना प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून या अंध मुलांच्या फिटनेसबराेबरच अात्मविश्वास अाणि शालेय अभ्यासातील एकाग्रतेत वाढ हाेऊन त्यांचा खूप फायदा झाल्याचे समाधान माझ्यासाठी जीवनातील सगळ्यात माेठा पुरस्कार असल्याचेही देशपांडे यांनी नमूद केले. यावेळी त्यांचे शिष्य व्यंकटेश मुंदाडे, चंद्रकांत माेरे, संदीप चव्हाण अाणि काेमल पाटील, सुषमा कानीणी, स्वरांजली पाेळ यांनी मलखांब अाणि राेप मलखांबवर चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखवली.
 
नाशिकचे ज्येष्ठ मलखांब मार्गदर्शक अाबासाहेब घाडगे यांच्या हस्ते देशपांडे यांचा सत्कार करण्यात अाला. यावेळी यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील उपस्थित हाेते. शलाका भेंडे यांनी सूत्रसंचालन केले.
 
‘समर्थ’मध्ये ६०० विदेशी, जर्मनीत १४०० ना प्रशिक्षण
समर्थ व्यायामशाळेत भारतीय मुलांबराेबरच अनेक विदेशी युवक-युवती अाणि अगदी ज्येष्ठ माणसेदेखील मलखांब शिकायला येतात. त्यामुळे हजाराे भारतीय मुलांबराेबरच सुमारे ६०० विदेशी युवक-युवती समर्थमध्ये प्रशिक्षण घेऊन गेले अाहेत. तसेच गत दीड दशकापासून मी अाणि माझे काही शिष्य जर्मनीत जाऊन तेथील सुमारे १४०० मुलांना मलखांबचे प्रशिक्षण दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...