आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईच्या अंत्यविधीसाठी जाणार्‍या मुलाचा नाशिकमध्ये अपघाती मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आईच्या अंत्यविधीसाठी मुंबई येथे जाण्यासाठी निघालेल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची करुणाजनक घटना येथे शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गरवारे पॉइंट येथे घडली. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

महेंद्र यादव अहिरे (वय 45, रा. गोवर्धन) हे दुपारी 12 वाजेच्या सुमारास गरवारे पॉइंट येथे मुंबईला जाण्यासाठी सर्व्हिसरोडवर खासगी वाहनाची वाट बघत होते. त्याच वेळी मुंबईकडे भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने (एमएच 15 डी 9295) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अहिरे यांच्या अंगावरून ट्रकची चाके गेल्याने ते जागीच ठार झाले. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईच्या अंत्यविधीनंतर मुलाचा अंत्यविधी : महेंद्र अहिरे यांची आई शकुंतलाबाई यांचे वृध्दापकाळाने वडाळा (मुंबई) येथे निधन झाले. महिंद्र त्याच अंत्यविधीला जाण्यासाठी निघाले असता काळाने त्यांच्यावरच घाला घातला. त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त त्यांच्या नातेवाइकांना समजताच त्यांनी प्रथम आईचा अंत्यविधी आटोपला व लगेच नाशिककडे मुलाच्या अंत्यविधीसाठी धावपळ करत आले.