आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: ‘मन में है विश्वास’ची २० दिवसांत तिसरी अावृत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एखाद्या मराठी पुस्तकाने एक-दाेन वर्षांत दाेन-तीन अावृत्त्या अापल्या नावावर नाेंदवल्याचे बघायला मिळते, मात्र एखादे पुस्तक २० दिवसांत तिसऱ्या अावृत्तीकडे वाटचाल करते ही बाब मराठी साहित्यासाठी नक्कीच अानंददायी अाहे. अायपीएस अधिकारी व अाैरंगाबाद विभागाचे विशेष पाेलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या ‘मन में है विश्वास’ या पुस्तकाने ही किमया घडविली अाहे.

मे महिन्याच्या अखेरीस नांगरे पाटील यांच्या ‘मन में है विश्वास’ या पुस्तकाचे राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशन झाले. काेणताही प्रकाशक एखाद्या पुस्तकाची पहिली अावृत्ती ही साधारणत: एक हजार वा दाेन हजार प्रतींची तयार करताे; पण या पुस्तकाची पहिलीच अावृत्ती ५००० पुस्तकांची तयार झाली अाणि अाठवडा उलटत नाही ताेच ती संपलीही. दुसरी अावृत्तीही पाच हजार प्रतींची निघाली अाणि तीदेखील अाता संपण्याच्या मार्गावर अाहे. त्यामुळे अाता तिसरी अावृत्ती तयार हाेत अाहे तीदेखील पाच हजार प्रतींची. याचाच अर्थ फक्त २० दिवसांत तब्बल दहा हजार प्रती वाचकांच्या हाती पडल्या अाहेत. मराठी साहित्यात तरी हा विक्रम अद्याप कुठेही नाेंदविलेला नाही, ती किमया या पुस्तकाने घडविली अाहे. या पुस्तकात नांगरे पाटलांनी स्वत:चा संघर्ष तर टिपलाच अाहे. त्याचबराेबर विद्यार्थी अाणि पालकांशीही करिअर, शिक्षण, जिद्द या विषयी संवाद साधला अाहे. तसेच पाटील यांनी स्वत: दिलेल्या स्पर्धा परीक्षांच्या अनुभवातून यासंदर्भातही त्यांनी विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केले अाहे. त्यामुळे हे पुस्तक अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत अाहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या हाती हे पुस्तक दिसत अाहे.

‘जेवढा माेठा संघर्ष तेवढं माेठं यश. काळ बदलताे, वेळ बदलते, पात्रं बदलतात व भूमिकाही. फक्त मनगटांत स्वप्नांना जिवंत करण्याची पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द अाणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते,’ असे म्हणत एका निडर अायपीएस अधिकाऱ्याने केलेले हे प्रेरक अाणि मैत्रीपूर्ण मार्गदर्शनच अाहे. म्हणूनच या पुस्तकाला वाचकांची पसंती मिळते अाहे.

संवाद, स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन तरुणाईला अावडले
मुलांना थाेडंसं मार्गदर्शन करावं हा माझा हेतू हाेता. ताे सफल झाला अाहे. हे पुस्तक फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर पालक, शिक्षक यांच्यासाठीदेखील उपयुक्त अाहे. किंंबहुना समाजातील सर्व अंगांसाठी उपयुक्त अाहे. त्यात मी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातही लिहिलं अाहे. त्यामुळे या परीक्षा देणाऱ्यांसाठीदेखील ते महत्त्वाचे ठरत अाहे. अभ्यास कसा करावा, का करावा यावर संवाद साधतानाच व्यक्तिमत्त्व विकास कसा हाेईल, यावर मी भर दिला अाहे. अशा सर्व बाबींमुळेच हे पुस्तक वाचकांना अावडत अाहे. लाेकप्रिय ठरत अाहे.
विश्वास नांगरे पाटील, लेखक तथा अायपीएस अधिकारी
बातम्या आणखी आहेत...