आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियोजन सिंहस्थाचे, भाविकांना 7 किलोमीटर पायपीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थकाळात त्र्यंबकरोड मार्गे पर्वणीकरिता येणाऱ्या भाविकांसाठी सुमारे किलाेमीटर पायी अंतर चालून गोदाघाटावर पोहोचण्याचे नियोजन आहे. मार्गावर २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, चार वॉच टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्र्यंबकरोडमार्गे किमान २० टक्के भाविक येण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांच्या तुलनेत रामकुंडावर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने खंबाळे गावाजवळ बाह्य पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे.
त्र्यंबकरोड मार्गाच्या नियोजनाची माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. त्र्यंबकरोडवरील खंबाळे गावाजवळ भाविकांच्या वाहनांसाठी बाह्य पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. किमान १० हजार वाहनांसाठी पार्किंग सुविधा ठेवण्यात आली आहे. येथून एसटी बसने सातपूर बसस्थानक पार्किंगपर्यंत येण्याचे नियोजन आहे. येथून किलोमीटर पायी स्नानाच्या ठिकाणी जाता येणार आहे. बाह्य आणि मध्य पार्किंगचे अंतर ४.७८ किलोमीटर आहे. घाट परिसरात ७०० मीटर अंतरावर पोलिस चौकी निर्माण करण्यात आली आहे. भाविकांसाठी निवाराशेड उभारण्यात येणार आहे. मार्गावर २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. चार वॉच टॉवर बसविण्यात येणार आहेत. मार्गावर २३०० मीटर अंतरावर बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. भाविकांसाठी सुरक्षित मार्ग ठेवण्यात आले आहेत.
बॅरि केडिंगचे नियोजन
वाहतूक सुरळीतपणे व्हावी, याकरिता या मार्गावर २३०० मीटर बॅरिकेडिंग करण्याचे नियोजन आहे. यामध्ये बल्ली, मोझा, मुव्हेबल बॅरिकेडिंगचा समावेश आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे
मार्गावर २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. चार वॉच टॉवर लावण्याचेही नियोजन आहे. चार पोलिस चौक्या कार्यान्वित करण्यात येणार आहेत.