आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टर गिरविणार नैतिक व्यवहाराचे धडे, कार्यशाळेचे नाशिकमध्ये पुढील वर्षी आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- डॉक्टर उपचारांकरिता कितीही निष्णात असले, तरी काही वेळा त्यांच्याकडे व्यवस्थापन कौशल्याचा अभाव असल्याचे दिसते. त्यातच नैतिक व्यवहाराबाबतही चर्चा सुरू झाली असून, या दोन्ही विषयांवर एक दिवसाची राष्ट्रीय कार्यशाळा नाशिकमध्ये आयोजित करण्याचा मान मिळाला आहे.
नाशिक ऑर्थोडॉटिक स्टडी ग्रुपच्या विनंतीला मान देत राष्ट्रीय कार्यकारिणीने पुढील वर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या कार्यशाळेकरिता नाशिकचे नाव निश्चित केले असून, नवी दिल्ली, मुंबई, बेंगळूरू यांसारख्या मेट्रो सिटीनंतर अशा प्रकारे टायर टू शहरात होणारी ही पहिलीच कार्यशाळा असल्याने तिला महत्त्व आले आहे.

आजारांचे अचूक निदान आणि उपचार यांत डॉक्टर निष्णात असले, तरी त्यांच्या एकूणच अभ्यासक्रमात संभाषण, वर्तणूक कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रॅक्टिस कशी करावी, याचा समावेश नसल्याने त्यात ते कमी पडतात. यातूनच मग रुग्णाशी साधला जाणारा संवाद, परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य यात ते कमी पडल्याने गैरसमज िनर्माण होतात. डॉक्टर आणि रुग्ण यातील सुसंवाद वाढावा याकरिता नाशिक ऑर्थोडॉटिक स्टडी ग्रुपने पुढाकार घेत पश्चिम विभागातर्फे ही राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. देशभरातील दोनशेवर डॉक्टर्स आणि तज्ज्ञ यात सहभागी होणार आहेत. डॉ. सुनील नागमोडे, डॉ. दिग्विजय पाटील आणि डॉ. शीतल पटणी यांसह स्टडी ग्रुप ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.