आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडलाध्यक्षपदाचा वाद भाजप प्रदेशाध्यक्षांपुढे, निष्ठावंतांची नियुक्ती करण्याची केली मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतीय जनता पक्षाच्या सिडकाे विभाग अध्यक्षपदावरून झालेला वाद अाता प्रदेशाध्यक्षांच्या काेर्टात पाेहोचला अाहे. पक्षाच्या दाेन्ही अामदारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या या वादासंदर्भात मंगळवारी दुपारी सिडकाेतील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निष्ठावंतांची नियुक्ती करण्याची मागणी अामदार सीमा हिरे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे केली. चार दिवसांत या नियुक्तीवर फेरविचार हाेण्याचा दावा संबंधित पदाधिकाऱ्यांकडून करण्यात अाला अाहे.

नाशिक शहरातील सहाही विभागांच्या अध्यक्षपदांचा निवडणूक कार्यक्रम संघटनमंत्र्यांनी जाहीर केला अाहे. या अंतर्गत पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, अामदार बाळासाहेब सानप, निरीक्षक संभाजी माेरूस्कर यांच्या उपस्थितीत साेमवारी सिडकाे मंडल अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या पदासाठी माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, यशवंत नेरकर, अॅड. प्रकाश अमृतकर यांच्या नावाची चर्चा असतानाच, अचानकपणे गिरीश भदाणे यांच्या नावाची घाेषणा करण्यात अाली. या प्रकाराने खुद्द विद्यमान अामदार सीमा हिरे यांच्यासह उपस्थित स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते अवाक् हाेऊन त्यांनी विराेधात घाेषणाबाजी केली. याप्रसंगी अामदार अपूर्व हिरे यांनी भदाणे यांची निवड पक्षातील सदस्यांच्या पाठिंब्यानेच झाल्याचा दावा केला. त्यास अामदार सीमा हिरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी विराेध दर्शवित सभागृहातच ठिय्या मांडला हाेता.
अखेरीस सर्वानुमते बाळासाहेब पाटील यांची निवड जाहीर करून त्यांचाही सत्कार करण्यात अाला. एकाच मंडलला दाेन अध्यक्ष नियुक्त झाल्याने याप्रसंगी गाेंधळ वाढतच गेला.
यावर सावजी यांनीही नाराजी व्यक्त करीत प्रदेश पातळीवरून भदाणे यांचे नाव अाल्याचे जाहीर केले हाेते. या सर्व प्रकाराने पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर अाली असून, निष्ठावंताएेवजी बाहेरून अालेल्या नवख्यांना पदे मिळत असतील तर पक्षात राहण्याचा उपयाेग काय, असा थेट सवाल उपस्थित करून पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा उगारला.
दरम्यान, या वादावर ताेडगा काढण्यासाठी सीमा हिरे यांच्यासह नगरसेवक सतीश साेनवणे, बाळासाहेब पाटील, अॅड. अमृतकर, डाॅ. मंजूषा दराडे, अलका अाहिरे, कैलास अहिरे, प्रदीप पेशकार यांच्यासह जवळपास १०० कार्यकर्त्यांनी मुंबईत धाव घेतली. प्रदेशाध्यक्ष दानवे यांची भेट घेत भदाणे यांच्या नावाला विराेध दर्शविला. या चर्चेत दानवे यांनीही स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन संघटनमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. सर्वानुमतेच निर्णय घेणे गरजेचा असल्याचे सांगत त्यांनी पक्षाच्या काेअर कमिटीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबराेबर भदाणे यांना कुठलीही कार्यकारिणी जाहीर करण्याचे अादेश दिल्याचेही सांगण्यात अाले.

चार दिवसांत सकारात्मक निर्णय
सिडको मंडल अध्यक्षपदी काेअर कमिटीने जाहीर केलेल्या नावाविषयी खुद्द प्रदेशाध्यक्षच अनभिज्ञ दिसले. या निवडीबद्दल झालेल्या वादाची संपूर्ण माहिती प्रदेशाध्यक्षांना देण्यात अाली असून, त्यांनी मुख्यमंत्री, संघटनमंत्र्यांशी याविषयी चर्चा करून चार दिवसांत याेग्य ताे निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. - सीमा हिरे, आमदार, पश्चिममतदारसंघ
पुढे वाचा... भाजप पश्चिम मंडल अध्यक्षपदी देवदत्त जाेशी
बातम्या आणखी आहेत...