आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्विघ्न कुंभमेळ्यासाठी नियाेजन समाधानकारक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साधू-महंतांसहलाखाे भाविकांच्या मांदियाळीत हाेऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशासनाची लगबग सुरू अाहे. या संपूर्ण सुरक्षात्मक उपाययोजनेचा राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाल यांनी साेमवारी अाढावा घेतला. नाशिक त्र्यंबकेश्वरमधील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून शहर ग्रामीण पोलिसांच्या नियाेजनाविषयी समाधान व्यक्त केले. सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त बंदोबस्त देऊन हा मेळा निर्विघ्नपणे पार पाडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
एका काेटीवर भाविक कुंभमेळ्यात सहभागी हाेणार असल्याच्या शक्यतेवर आधारित प्रशासन नियोजन करीत अाहे. एकाच वेळी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये हा साेेहळा हाेत असल्याने शहर अाणि ग्रामीण अशा दाेन्ही पातळ्यांवर पोलिस प्रशासनाला विशेष व्यवस्था करावी लागत अाहे. त्याविषयी माहिती घेत प्रत्यक्ष महत्त्वाच्या स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. मात्र, महाराष्ट्र पोलिस अकादमीत महत्त्वाची बैठक अायाेजित करण्यात अाल्याने साधुग्रामचा दाैरा रद्द करण्यात अाला. दरम्यान, पंजाबमधील अातंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अातंकवादी विराेधी पथक तसेच बाॅम्बशाेधक पथकाला सतर्क राहण्याच्या दयाल यांनी सूचना दिल्या.

या प्रसंगी नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक जयजित सिंह, राज्य गुप्त वार्ता विभागाच्या महासंचालक रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपायुक्त एन. अंबिका, विजय पाटील, पंकज डहाणे, सहायक आयुक्त रवींद्र वाडेकर, सचिन गोरे, प्रशांत वायगुंडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
साेहळा निश्चितच यशस्वी हाेईल

सीमांवर नाकेबंदी
पंजाबमध्येझालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर नाकेबंदी करण्याचे आदेश अाहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन महासंचालकांनी केले.

याठिकाणांची पाहणी
त्र्यंबकेश्वरमधीलकुशावर्त कुंड, गोरक्षनाथ घाट, जगद‌्गुरू श्रीचंद्र भगवान घाट, अहिल्या घाटाची दयाल यांनी पाहणी केली. त्यानंतर नाशकातील रामकुंड, वाहनतळ परिसरात फेरफटका मारण्यात अाला. वस्त्रांतरगृहातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षालाही त्यांनी भेट दिली. तसेच साधुग्रामच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलिस आयुक्तांकडून माहिती घेतली.

कुंभमेळा नियोजनाचा अाढावा घेतला. शहर ग्रामीण, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने केलेले नियोजन समाधानकारक आहे. त्यातून निश्चितच हा साेहळा यशस्वीपणे पार पडले, असा विश्वास वाटताे. -संजीवदयाल, पोलिस महासंचालक