आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मँगो कुकीज्, बिस्किट अन‌् केकची उद्या स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आंब्याच्या मोसमाची रंगत वाढविण्यासाठी ‘दिव्य मराठी’ कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे ते मेदरम्यान विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात पहिल्या दिवशी मँगो कुकीज‌्, बिस्किट केकची स्पर्धा होणार आहे. स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय, तृतीय दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना मे रोजी आकर्षक बक्षिसांनी गौरविले जाईल.

जुना आग्रारोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात सुरू असलेल्या आंबा महोत्सवात या स्पर्धा रंगतील. कैरीचे लोणचे, कैरीचे पन्हे, मँगो लस्सी स्पर्धांसाठी पदार्थांबरोबर रेसिपीही लिहून आणणे गरजेचे आहे. या रेसिपीखाली स्पर्धकाचे नाव संपर्क क्रमांक देणे बंधनकारक असेल. मे रोजी आंबा खाण्याच्या स्पर्धेसाठी १० वर्षाआतील मुलामुलींना सहभागी होता येईल.
अखेरच्या दिवशी आंबा रंगाचे वस्त्र परिधान केलेल्यांचा फॅशन शो होणार आहे. या शोमध्ये लहान बालकांसह, मुली-महिलांना सहभागी होता येईल, असे कोकण पर्यटन विकास संस्थेचे संचालक दत्ता भालेराव यांनी सांगितले.

विनाशुल्क सहभाग, मात्र नाव नोंदणी आवश्यक आंबा महोत्सवातील सर्वच स्पर्धा दुपारी वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात सुरू होतील. स्पर्धेत सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, सहभागासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. ज्या स्पर्धकांनी नावे नोंदविली आहेत त्यांनाच स्पर्धेत सहभाग घेता येईल. नाव
नोंदणीसाठी संपर्क - ९६८९६७८४०८ किंवा ९१७५३२५९४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.