आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manikrao Kokate News In Marathi, Divya Marathi, Assembly Election

आमदार कोकाटेंच्या संदिग्धतेमुळे वाढला ‘राजकीय सस्पेन्स’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीस काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटेंनी हूल दिल्याचे वृत्त प्रसिध्द होताच राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले. नविडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगणा-या कोकाटेंनी ‘कोणताच पक्ष अस्पृश्य नाही’ असे वक्तव्य करून टाकलेली गुगली त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी कुतूहल निर्माण झाले होते.
कोकाटे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विकासकामांच्या उद‌्घाटनाचा त्यांनी धडाका लावला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी कधी नव्हे तो सहा तासांचा वेळ दिल्याने कॉंग्रेस कॉँग्रेसशीच एकनिष्ठ असल्याचे सांगण्यात आले. मात्र याच कार्यक्रमात कोकाटेंनी केलेले ‘मुख्यमंत्री कोण असेल याची चिंता करु नका सनि्नरचा आमदार मीच’ हे विधान पुन्हा चर्चेत राहिले. त्याचे कवित्व संपते न संपते तोच इच्छुकांच्या मुलाखतीस कोकाटे अनुपस्थित राहिल्याने उत्कंठा वाढली आहे.

भाजप प्रवेशाची चर्चा : कोकाटेंच्या भाजपा प्रवेशाची चर्चा तारीख स्थळासह चर्चिली जात आहे. मात्र वरिष्ठ भाजपा नेतृत्वाकडून याबाबत अद्याप अधिकृत काही सांगितले जात नाही. तर कोकाटे हे विनोद तावडे यांच्या संपर्कात असल्याचे समजते. कोकाटे भाजपात प्रवेश करू शकतात मात्र सनि्नरची जागा शविसेनेच्या वाट्याला असल्याने ती भाजपासाठी सुटणे अवघड आहे. तरीही तावडे यांच्या माध्यमातून ही जागा शिवसेनेकडून काढून घेतली तर कोकाटेंचा भाजपा प्रवेश दूर नाही. हा प्रवेश होवू न शकल्यास कॉँग्रेसमध्ये इच्छुकांच्या मुलाखतीस उपस्थित न राहताही सलग तीन वेळा आमदार असल्याने कोकाटेंना वनिा मुलाखत कॉँग्रेसची उमेदवारी मिळणेअशक्य नाही.