आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manja Bonfire For The Birds Safety By Kunasathi Kahitari Organisation In Nashik

पक्ष्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न, संकलित नायलॉन मांजाची केली हाेळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मकरसंक्रांतीच्याकाळात शहरातील झाडे, खांब, इमारती यांवर अडकलेला पतंगांचा मांजा काढण्याची माेहीम ‘कुणासाठी काही तरी’ या संस्थेच्या सदस्यांनी राबविली. त्यातून माेठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जमा करण्यात अाला आणि त्याची हाेळी करण्यात अाली. या माेहिमेमुळे असंख्य पक्ष्यांना होणारी इजा टळली आहे.
दर वर्षीप्रमाणे यंदाही संक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा झाला. प्रत्येक इमारतीच्या गच्चीवर पतंग उडविणाऱ्या अाबालवृद्धांची गर्दी दिसून आली. या दिवशी पतंगांच्या काटाकाटीत कटलेल्या पतंगांपैकी अनेकांचा मांजा झाडे खांबांवर, तसेच इमारतींचे अँगल, तर केबलच्या वायरलाही अडकल्याचे आढळून आले. या काळात पक्षी जखमी हाेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. अशा अडकलेल्या मांजात पक्ष्यांचे पंख पाय अडकून ते जखमी हाेण्यासह मानेला फास बसून मृत्युमुखी पडणाऱ्या पक्ष्यांची संख्याही माेठी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या ‘कुणासाठी काहीतरी’ या संस्थेच्या सदस्यांनी पक्ष्यांना वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी परिसरातील झाडांवर, इमारतींवर, जिन्यात अडकलेला मांजा संकलित करून त्याची होळी केली. या उपक्रमात सागर कासे, पुरुषाेत्तम अाव्हाड, राहुल दिवटे, उमेश धामणे, पायल देसाई, रूपाली जाेशी, विकी माहेश्वरी यांनी सहभाग घेतला.
महिलेची दुखापत टळली
ढिकलेनगरयेथील अंजली निरंतर या लिफ्टबाहेर येत असताना त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. नेमके त्याच वेळी ‘कुणासाठी काहीतरी’ संस्थेचे स्वयंसेवक मांजा संकलित करीत हाेते. त्यांनी तातडीने धाव घेत संंबंधित महिलेच्या गळ्यातील मांजा काढला. त्यामुळे अंजली निरंतर यांना होऊ पाहणारी दुखापत टळली.

‘कुणासाठी काही तरी’ संस्थेतर्फे मोठ्या प्रमाणात मांजा जप्त करण्यात आला.