नाशिकराेड - रेल्वेप्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने मनमाड-इगतपुरी-मनमाड शटलच्या वेळेत बदल केला आहे. १० एप्रिलपासून शटल नवीन वेळेनुसार धावेल. मनमाड-इगतपुरी शटल १४.३० एेवजी १३.५० वाजता जाईल. इगतपुरीवरून १७.४० एेवजी १७.२० वाजता पाेहचेल. मार्गावर शटल समिट १४.०२, लासलगाव १४.१५, उगाव १४.२५, निफाड १४.३३, कसबे-सुकेणे १४.४२, खेरवाडी १४.४९, आेढा १४.५९, नाशिकराेड १५.२०, देेवळाली १५.३०, लहवित १५.४२, अस्वली १५.५०, पांढुर्ली १५.५८, तर घाेटीला १६.१० वाजता पाेहचेल. परतीला शटल इगतपुरी येथून १८.१० एेवजी १७.४५ वाजता सुटेल, मनमाडला २०.३५ एेवजी १९.३५ वाजता पाेहचेल. घाेटीला १७.५७, पाडळी १८.०५, अस्वली १८.१२, लहवित १८.१९, देेवळाली १८.२८, नाशिकराेड १८.३८, आेढा १८.५०, खेरवाडी १८.५८, कसबे-सुकेणे १९.५, निफाड १९.०९, उगाव १९.१७, लासलगाव १९.२७, समिट १९.३५ वाजता पाेहचेल.