आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळिशी पूर्ण: ‘पंचवटी’ मनमाडला क्र. 1 प्लॅटफार्मवरून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसला ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवसापासूनच सोमवारी (दि. २) रेल परिषदेच्या मागणीनुसार गाडीच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे. परिषदेने मुंबईला जाताना चार, तर येताना एक नंबरच्या प्लॅटफॉर्मची मागणी केली होती. प्रशासनाने मनमाडला जाताना या गाडीसाठी एक नंबरवरची मागणी पूर्ण केली आहे.

जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची दररोज मुंबई-मनमाड ने-आण करणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस गाडीला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त रोज ये- जा करणाऱ्यांसाठी १९७३ मध्ये नाशिक-मुंबई गाडी सुरू झाली होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने गाडी बंद झाली. नंतर नोव्हेंबर १९७५ साली पुन्हा नियमित गाडी सुरू झाली. नाशिकला गाडी मुक्कामासाठी जागा उपलब्ध नसल्याने गाडीचे मुंबईपर्यंत विस्तारीकरण झाले. गाडीच्या मनमाड-मुंबई प्रवासाला सोमवारी (दि. २) ४० वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीला गाडी डबलडेकर होती. रेल परिषदेच्या स्वच्छ कोच अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेऊन २००९ २०१५ मध्ये दोनदा पुरस्काराने गौरवले आहे.

लक्ष देण्याची गरज : पंचवटीएक्सप्रेसच्या यशस्वी प्रवासास आज चाळीस वर्षे पूर्ण झाली, त्याचा आनंद आहेच. मात्र या गाडीच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी म्हटले आहे.

समांतर गाडी सुरू करायला हवी
पंचवटीएक्सप्रेसने ४० वर्षांत लाखो प्रवाशांची ने-आण केली. प्रशासनाने पंचवटीला समांतर नाशिक-मुंबई गाडी सुरू करावी. राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

एकमेव एकवीस डब्यांची गाडी
देशातधावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसपैकी मनमाड-मुंबई धावणारी पंचवटी एक्सप्रेस ही एकमेव २१ डब्यांची गाडी आहे. देशातील इतर गाड्या १७ ते १८ डब्यांच्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...