आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणप्पुरम दरोडाप्रकरणी चार सराफ ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मणप्पुरम गोल्ड दरोडा प्रकरणी उपनगर पोलिसांनी चार सराफांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अर्धा किलो सोने हस्तगत केले. त्यांना अटक करून दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गंगापूररोड परिसरात मुंबई व नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत या दरोड्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या संशयितांनी पोलिस कोठडीत असताना कारवार येथील चार सोनारांना सोने विकल्याचे कबूल केले. उपनगर पोलिसांच्या पथकाने कारवार येथून संतोष रायकर, कृष्णा रायकर, मंदा अमृटकर व राघवेंद्र देवेंद्र यांना ताब्यात घेतले. या सराफांची कसून चौकशी केली असता त्यांनी सोने खरेदी केल्याचे कबूल केले. त्यातील अर्धा किलो सोने पोलिसांनी हस्तगत केले. या प्रकरणी चौघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंडिराम पोपेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या दरोड्यासंदर्भातील आणखी बाबी लवकरच उलगडणार असल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगीतले. ठाणे पोलिसांनी गंगापूर व उपनगर पोलिसांच्या मदतीने गंगापूररोड भागात संयुक्त कारवाई करत तीन संशयितांना अटक केली होती.