Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Manse and BJP politics in nashik

नगरसेवकांना थाेपवणार मनसेची निर्णायक चाल

प्रतिनिधी | Update - Dec 25, 2015, 08:02 AM IST

माजी पदाधिकाऱ्यांशी संबंधित सात ते अाठ नगरसेवकांना गळाला लावून पाहणाऱ्या भाजपला धक्का देण्यासाठी मनसेने अाता फेब्रुवारीत हाेणाऱ्या

 • Manse and BJP politics in nashik
  नाशिक - माजी पदाधिकाऱ्यांशी संबंधित सात ते अाठ नगरसेवकांना गळाला लावून पाहणाऱ्या भाजपला धक्का देण्यासाठी मनसेने अाता फेब्रुवारीत हाेणाऱ्या स्थायी समितीच्या पुनर्रचनेत पाच जागांसाठी अाताच नाराज उमेदवारांची नावे निश्चित करून संधी देण्याची तयारी सुरू केली अाहे. यापूर्वी स्थायी समितीवर गेलेल्यांना प्रभाग समिती सभापतिपद दिले जाणार असून, मनसेच्या निर्णायक चालीमुळे अाता भाजपचे फाेडाफाेडीचे राजकारण कितपत यशस्वी ठरते, हे बघणे रंजक झाले अाहे.

  मनसेला साेडचिठ्ठी देऊन भाजपात गेलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी अाता स्वत:चे स्थान भक्कम करण्यासाठी जमवाजमव सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून कुंपणावर असलेल्या मनसेतील अापल्या समर्थकांना भाजपात घेण्यासाठी कंबर कसली अाहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे पहिल्या टप्प्यात सात ते अाठ नगरसेवक भाजपात दाखल हाेणार असून, या साेहळ्याची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात अाली अाहे. मात्र, भाजपात गेल्यानंतर नेत्यांचे व्यवस्थित पुनर्वसन झाले नसल्यामुळे किंबहुना पक्षाचा प्राेटाेकाॅल बघता नव्याने दाखल झाल्यानंतर पुरेसा मान पदे मिळतील याची शाश्वती नसल्यामुळे प्रवेश इच्छुक नगरसेवकांची पाय सध्या तरी अडखळत अाहे.

  दरम्यान, मनसेच्या वतीनेही अाता अशा कुंपणावर असलेल्या नगरसेवकांना गाेंजारण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, अशा नगरसेवकांना महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्यत्व देण्याची तयारी सुरू केली अाहे. मनसेचे काेट्याप्रमाणे पालिका स्थायी समितीवर पाच सदस्य असून, याव्यतिरिक्त दाेन प्रभाग समितीची सभापतीपदेही मनसेकडे अाहेत. अशा या पार्श्वभूमीवर अाता नाराज नगरसेवकांची नावे अाताच निश्चित करून त्यांना निवडणुकीपर्यंत थाेपविण्याचे प्रयत्न सुरू झाले अाहेत.

  अभ्यंकरयांचा झटपट अाढावा : गुरुवारी(दि. २४) एक दिवसाचा झटपट दाैरा करून पक्षाचे संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी पक्षातील नाराज नगरसेवकांच्या संदर्भातील पुढील रणनीतीबाबत चर्चा केल्याचे सांगितले जाते. या नगरसेवकांना पक्षनिष्ठेची जाणीव करून देऊन त्यांच्यात जर काेणात अन्यायाची भावना असेल तर त्यांची समजूत काढून पुढील फेरबदलात महापालिकेत चांगले स्थान देण्याचा शब्दही दिल्याचे सांगितले जाते.

  मनसेच्या नगरसेवकांना मृगजळाची भीती
  राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांशी असलेले संबंध यापूर्वी मनसेतून भाजपत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना मिळालेली दुय्यम वागणूक बघता नगरसेवक अद्यापही संभ्रमात असल्याचे चित्र अाहे. अद्याप काेणीही उघडपणे पक्षबदलाबाबत चर्चा करीत नसून भाजपबाबत असलेल्या मृगजळाची धास्ती वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. खासकरून यानिमित्ताने भाजपच्या अाक्रमक अामदार देवयानी फरांदे यांच्याविराेधातील गटाचे शिलेदार असाही शिक्का बसण्याची भीती असून, त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांचे चिंतन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Trending