आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नवनिर्माणा’साठी जम्बो कार्यकारिणी, स्थापनेपासून सोबतच्या निष्ठावंतांना मिळाली बढती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थापनेपासून असलेल्या शिलेदारांच्या बंडाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महापालिका नविडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ९० जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली असून, त्यात निष्ठावंतांसह अनेक नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.

निष्ठावंतांसह युवा चेहऱ्यांच्या माध्यमातून संघटनेला नवीन झळाळी ताकद देण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रयत्न असून, संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर, प्रदेश उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष राहुल ढिकले, शहर प्रवक्ते संदीप लेनकर यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी (दि. ८) ही कार्यकारिणी जाहीर झाली असून, पदाधिकाऱ्यांनी तिचे स्वागत केले आहे.

..अशी आहे संख्या
विभागअध्यक्ष
निरीक्षक प्रशासन
१० शहर उपाध्यक्ष
१४ शहर सरचिटणीस
२६ शहर चिटणीस
२९ शहर संघटक

शहर चिटणीसपदावर २६ जणांना संधी
शहरचिटणीसपदी सोमनाथ वडजे, जालिंदर शिंदे, राम संधान, मिलिंद गोसावी, दिनेश नाचण, नितीन जाधव, नीलेश सहाणे, किरण क्षीरसागर, अविनाश पाटील, कुणाल भोसले, डॉ. विलास भदाणे, अमित गांगुर्डे, नीलेश ठाकरे, एकनाथ उबाळे, सचिन सिन्हा, भाऊसाहेब ठाकरे, मोईन बागवान, बापू यशोद, राजेंद्र मोरे, लालचंद साळुंखे, भालचंद्र देसले, निशांत जाधव, कृष्णकांतकुमार नेरकर, राहुल राजपुरोहित, केशव बोराडे, अमोल हिरवे या २६ जणांची नविड करण्यात आली आहे.

सरचिटणीसपदी १४ युवा चेहरे
शहर सरचिटणीसपदी १४ युवा चेहऱ्यांची नविड करण्यात आली असून, त्यात संतोष काेरडे, सत्यम खंडाळे, मन्सूर पटेल, निखिल सरपोतदार, भाऊसाहेब निमसे, नंदू वराडे, प्रवीण भाटे, प्रवीण पवार, योगेश गांगुर्डे, शांताराम चौधरी, अरिंजय नाईक, विजय आहिरे, अॅड. अतुल सानप, प्रमोद साखरे यांचा समावेश आहे. त्याते प्रामुख्याने नवीन चेहऱ्यांचाच समावेश आहे.

विभागीय अध्यक्षपदी निष्ठावंतांना प्राधान्य
विभागीय अध्यक्षपदी निष्ठावंतांसह युवा चेहऱ्यांना संधी देताना नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्षपदी पंचवटी- अनंता सूर्यवंशी, पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष नाशिकरोड- प्रकाश कोरडे, नाशिक पश्चिम-सिडको- रामदास दातीर, नाशिक पश्चिम विभाग अध्यक्ष- सातपूर सोपान शहाणे, मध्य नाशिक विभाग अध्यक्ष- अंकुश पवार यांची नविड करण्यात आली आहे.

निरीक्षक, प्रशासनाची जबाबदारी जणांकडे
पूर्व विधानसभा निरीक्षकपदी किशोर जाचक, मध्य विधानसभा निरीक्षकपदी सचिन भोसले, पश्चिम विधानसभा निरीक्षकपदी सुरेश भंदुरे यांची नविड करण्यात आली. पक्षाच्या प्रशासकीय कामाकाजासंदर्भात मध्यवर्ती प्रशासन कार्यालय अध्यक्षपदी मनोज कोकरे, प्रशासन सचविपदी मनोज जोशी, संघटन सचविपदी पराग शिंत्रे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शहर संघटकपदी २९ शिलेदार
शहरसंघटकपदी सचिन सिसोदिया, तुळशीराम बैरागी, ज्ञानेश्वर बोडके, योगेश दाभाडे, गणेश आ वणकर, साहेबराव खर्जुल, मच्छिंद्र ताजनपुरे, धनंजय कोठुळे, सुरेंद्र सोनार, यशोदीप वाघ, हमीद शेख, विजय ठाकरे, प्रा. आदिनाथ नागरगोजे, रामलाल गोरखा, संजय देवरे, विजय आगळे, सुनील मटाले, डॉ. सुनील घाडगे, नितीन माळी, मनोहर काळे, राहुल जुन्नरे, एकनाथ बागुल, भालचंद्र पवार, हरीश गुप्ता, तुषार करवंदे, विनायक पगारे, नागेश चव्हाण, मिलिंद भालेराव, सागर चव्हाण या २९ जणांची नविड करण्यात आली आहे.

शहर उपाध्यक्षपदी १० जणांची वर्णी
शहरउपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्यांमध्ये वाळू काकड, श्रीराम कोठुळे, सुरेंद्र शेजवळ, संतोष क्षीरसागर, नितीन साळवे, मिलिंद काळे, भाऊसाहेब खेडकर, तुकाराम कोंबडे, गोरख आहेर, किरण खाडम या १० जणांचा समावेश आहे.