आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manse News In Marathi, Spreed Manse's Work To The Society ,Divya Martahi

‘मनसेची विकासकामे सामान्यांपर्यंत पोहोचवा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविषयी विरोधकांकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे मनसेकडून होणारी विधायक कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मनसेचे राज्य पक्षनिरीक्षक वसंत फडके यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार मोहीम राबविण्याबाबत वडाळारोडवरील साहिल लॉन्स येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात पक्षाच्या गटप्रमुखांसह उपस्थित कार्यकर्त्यांना पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.
सरचिटणीस तथा आमदार वसंत गिते, अँड. उत्तमराव ढिकले, नितीन भोसले, महापौर अँड. यतिन वाघ, मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे आदी उपस्थित होते. शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य व नाशिकरोड विधानसभा मतदारसंघांतील सर्व गटप्रमुखांसह प्रमुख पदाधिकारी, तसेच नगरसेवकांना मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
आमदार वसंत गिते यांनी विरोधकांवर हल्ला करत पक्षाकडून विविध विकासकामे केली जात असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केले. आमदार अँड. ढिकले, आमदार भोसले यांनीही मार्गदर्शन केले. मध्य विभाग निरीक्षक अनिल भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.