आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉन धाग्यात दरवर्षी अडकतात चार हजार पक्षी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उत्तरायण सुरू झाले की, त्याचदरम्यान पक्ष्यांच्या स्थलांतराचाही मोसम असतो. मात्र, उत्तरायणातल्या संक्रांतीला दरवर्षी पक्ष्यांवर "नायलॉन धागा'रूपी संक्रांत ओढावते. नायलॉन धाग्याचा झाडांच्या फांद्यांवर गुंता होतो त्यात असंख्य पक्षी अडकतात.पक्षीमित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये धाग्यात दरवर्षी चार ते पाच हजार पक्षी अडकतात. त्यातील अनेक पक्ष्यांचा खोलवर जखमांमुळे मृत्यू होतो.
मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडविताना आबालवृद्धांच्या अ नंदाला उधाण आलेले असते. परंतु, याच पतंगांचा धागा निरागस पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरत असतो. सुती धागा काही दिवसांनी गळून जातो, त्याची धारही बोथट होते; पण चायनीज धाग्यामुळे पक्षी वर्षभर जखमी होतात. त्यात चिमण्या, पारवे, शराटी शिकारा, पोपट, कावळे, साळुंकी, बुलबुल यांसारख्या असंख्य पक्ष्यांचा समावेश असतो. सुटकेसाठी पक्षी पंख फडफडवतात नायलॉन धागा खोलवर घुसून त्यांचे पंख तुटतात. काहींच्या मानेला जखम होते, तर काहींचे पाय तुटतात.

अधिक काळ या धाग्यात अडकलेल्या पक्ष्यांचा अन्नवाचून मृत्यू होतो. या पक्ष्यांना वाचविण्यासाठी पक्षीमित्र संघटना, पीपल्स फॉर अॅनिमल, नेचर क्लब, पर्यावरण पक्षीमित्र अशा संस्था कार्यरत आहेत. वैयक्तिक पातळीवरही अनेक पक्षीमित्र जखमी पक्ष्यांना वाचवतात. अग्निशामक दल, वनविभागाकडून उंचावर अडकलेल्या पक्ष्यांना सोडविण्यासाठी मदत केली जाते. दरवर्षी एक पक्षीमित्र सुमारे ३०० पक्ष्यांची सुटका करतो. म्हणजेच वर्षाला सुमारे चार ते पाच हजार पक्षी मांज्यात अडकत असल्याचे स्पष्ट होते.