आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकशास्त्रापुढे अनेक आव्हाने, कुलगुरू डॉ. पी. बी. विद्यासागर यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वैद्यकीय शास्त्रासमोर आज खूप मोठी आव्हाने असून, त्याला सामोरे जायचे असेल तर संशोधनात वाढ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. बी. विद्यासागर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १७ व्या वर्धापनदिन समारंभात ते बुधवारी (दि. १०) बोलत होते.
ते म्हणाले की, पूर्वी घरगुती उपचार होते, पण आता जुनी उपकरणे नष्ट होऊन नवनवीन उपचार पद्धतींचा वापर होतो. मात्र वैद्यकीय क्षेत्रापुढे नवीन आव्हाने उभी राहत असून, यावर मात करण्यासाठी विद्यार्थी शिक्षकांनी सातत्याने संशोधन करत राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातील शिक्षकांना अद्ययावत निरंतर व्यावसायिक वैद्यकीय शिक्षण दिले जात आहे.
आजच्या वैद्यकीय शिक्षणात वैद्यकीय आचारसंहिता, नीती शिक्षण यांच्याकडे अधिक लक्ष पुरवले जाणे गरजेचे आहे. रुग्णांना आपुलकी, विश्वास, मानसिक आधार आणि दर्जेदार उपचारांची अपेक्षा असते. डॉक्टरांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी आरोग्याविषयक कायदे, नियमावली इतर कायदेशीर बाबींची माहिती असल्यास ते अडचणींना समर्थपणे कायदेशीरपणे तोंड देऊ शकतील. त्यामुळे युनेस्कोच्या आशिया-पॅसिफिक बायोइथिक्स नेटवर्क चेअरच्या सहयोगाने वैद्यकीय शिक्षणाबाबतचे शिक्षकांना बायोइथिक्स प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिली.
समारंभात डॉ. वसंत देशपांडे, डॉ. सुदाम काटे, डॉ. मधुकर परांजपे, डॉ. श्रीकृष्ण फडके, डॉ. दिलीप पुराणिक, डॉ. अशोक रेगे डॉ. कमलाकर व्यवहारे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर विशेष प्रावीण्य मिळालेल्या १२० विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, विद्यापीठासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार...
बातम्या आणखी आहेत...