आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंतर्भाव: ‘रोड नेटवर्क’च्या तरतुदींचा विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- नाशिक शहराच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीचे सल्लागार वास्तुविशारद उन्मेष गायधनी यांनी शासनास सादर केलेल्या ‘रोड नेटवर्क प्लॅन’मधील बहुतांश तरतुदी विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
सुधारित आराखडा तयार करताना रस्त्यांना महत्त्व देण्यात आले आहे. समितीने रोड नेटवर्क प्लॅन शासनाला सादर केला होता. नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी नकाशातील बहुतांश तरतुदी नवीन विकास आराखड्यात समाविष्ट केल्या आहेत. त्यानुसार, दसक-पंचक ते द्वारका जोडणारा मार्ग, डेडएंड रस्ते जोडणे, पारंपरिक गाव रस्त्यांचा आराखड्यात समावेश करण्यात आला. रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचे आरक्षण वगळले, दसक-पंचकमधील शिवहद्द दुरुस्ती, तर महापालिका कॅन्टोन्मेंट बोर्डदरम्यानची शिवहद्द कायम करण्यात आली. गोदावरी नदीपात्रालगत सोमेश्वर मंदिरावरून जाणारा शंभर फुटी रस्ता वगळण्यात आला. अशोकनगर येथील रस्ता छोटा करण्यात आला, तसेच पंचक येथील पालिका उद्यानाची जागा बिल्डरच्या तावडीतून सोडविण्यात आली. मखमलाबाद चेहेडी येथील महापालिकेच्या शेवटच्या टोकाला असलेले आरक्षण रद्द करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन वाचविण्यात आली, तर मलनिस्सारण प्रकल्पाची निश्चिती करण्यात आली. जयराम हॉस्पिटलवरील रस्ता वगळण्यात आला. सर्व्हे नंबरच्या हद्दी कायम करून टॉवर लाइनखालील बाह्य वळण रस्ता वळविण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...