आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती महामाेर्चा २४ ला, एक काेटीची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काेपर्डी येथील घटनेचा निषेध नाेंदवण्यासाठी येत्या २४ सप्टेंबर राेजी सकाळी १० वाजता तपाेवन येथून मराठा समाजातर्फे मराठा क्रांती महामाेर्चा काढण्यात येणार असल्याची घाेषणा नियाेजन बैठकीत करण्यात अाली. यावेळी माेर्चासाठी अार्थिक मदत करण्याचे अावाहन करताच तासाभरात तब्बल एक काेटीची मदत देण्याची घाेषणा विविध मान्यवरांनी केली. अनेकांनी वाहनांची, काहींनी पाण्याची अाणि नाश्त्याची, तर काहींनी माेर्चा काळात वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारीही यावेळी घेतली. पाच लाखांहून अधिक समाजबांधव या मूक माेर्चाला उपस्थित राहतील, असे यावेळी सांगण्यात अाले.
अाैरंगाबादराेड येथील वरदलक्ष्मी लाॅन्स येथे शनिवारी (दि. ३) मराठा क्रांती माेर्चाच्या नियाेजनासंदर्भात बैठकीचे अायाेजन केले हाेते. या बैठकीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची
माेठ्याप्रमाणावर उत्स्फूर्तपणे उपस्थिती लाभली. माेर्चा तपाेवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अतिशय शांततेत मार्गक्रमण करेल, असे यावेळी सांगण्यात अाले. तसेच, या माेर्चाचे नेतृत्व काेणी एक करणार नसून, संपूर्ण मराठा समाजच करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात अाले. माेर्चाची तारीख जाहीर केल्यानंतर देणगी देऊ इच्छिणाऱ्यांनी मनाेगत व्यक्त केले. यावेळी हजारांपासून १० लाखांपर्यंत देणगी देण्याची घाेषणा उपस्थितांपैकी अनेकांनी केली. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी यावेळी सांगितले की, राजकारण बाजूला ठेवून समाजबांधवांनी माेर्चात सहभागी हाेणे अावश्यक अाहे. माेर्चानंतरच्या स्वच्छतेची जबाबदारी एनएसएसचे विद्यार्थी घेतील, असेही त्यांनी जाहीर केले. अामदार अपूर्व हिरे यांनी माेर्चाचे सूक्ष्म नियाेजन करण्याची गरज असल्याचे नमूद केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी राज्यात काेणाचीही सत्ता असली तरीही चुकीचे पायंडे पाडणाऱ्यांना माेर्चाच्या व्दारे चाेख उत्तर देण्याचे अावाहन केले. केवळ माेर्चाच्या काळातच नाही तर यापुढे प्रत्येक वेळी मराठा समाजाने संघटित राहणे गरजेचे असल्याचे माजी मंत्री डाॅ. शाेभा बच्छाव यांनी स्पष्ट केले. आमदार जयंत जाधव यांनी समाजाने एकत्र येण्याची वेळ अाल्याचे नमूद केले. यावेळी माजी मंत्री प्रशांत हिरे, अामदार अनिल कदम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयश्री चुंभळे, अद्वय हिरे, दिलीप बनकर, डाॅ. अात्माराम कुंभार्डे, चंद्रकांत बनकर, नाना महाले, दिलीप वनारसे, शरद काेशिरे, संजय पवार, अशाेक सावंत, डाॅ. शैलेंद्र गायकवाड, शिशिर शिंदे, डाॅ. प्रशांत थाेरात, सुनील बागुल, नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे, शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे, प्रकाश बाेराडे, याेगिता अाहेर, डाॅ. हेमलता पाटील, प्रगती पवार, शाेभा अावारे, तानाजी फडाेळ, सुरेश पाटील, रंजन ठाकरे, अर्जुन टिळे, शशिकांत जाधव, नरेश पाटील, अनिल ढिकले, निवृत्ती अरिंगळे अादी उपस्थित हाेते.

असे झाले बैठकीत नियाेजन
{४० समित्यांची निर्मिती
{ अधिकाधिक महिलांनी सहभागी हाेण्याचे अावाहन करण्यात अाले.
{ माेर्चाच्या अग्रभागी महिलावर्ग असेल.
{ माेर्चादरम्यान तंबाखू, गुटखा खाण्यास वा सिगारेट अाेढण्यास मज्जाव
{ माेर्चात काेणीही घाेषणा देण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे
{ काळ्या फिती लावून शांततेच्या मार्गाने सहभागी हाेण्याच्या सूचना
{ माेर्चानंतर मविप्र एनएसएसचे पाच हजार विद्यार्थी स्वच्छता करणार
{ माेर्चात पाण्याची अाणि नाश्त्याची व्यवस्था केली जाणार
{ साेशल मीडियावर विविध ग्रुप्सची स्थापना
{ साेशल मीडियावरील कमेंट खाली नाव टाळण्याच्या सूचना

साेमवारी निमंत्रित पदाधिकाऱ्यांची बैठक
मराठा क्रांती माेर्चासंदर्भात येत्या साेमवारी निवडक अाणि निमंत्रित पदाधिकाऱ्यांची बैठक गाेल्फ क्लब येथे अायाेजित करण्यात अाली अाहे. या बैठकीत माेर्चाच्या सूक्ष्म नियाेजनावर चर्चा हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...