आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चासाठी राज्यस्तरीय समित्या, 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी मुंबईत निघणार मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल - Divya Marathi
फाईल
नाशिक  - काेपर्डी येथील बलात्कार प्रकरणातील अाराेपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला अारक्षण मिळावे, अॅट्राॅसिटीचा कायद्यात बदल व्हावा अादी मागण्यांसाठी क्रांतिदिनी अर्थात ९ अाॅगस्ट राेजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती माेर्चासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठीही राज्यस्तरीय सुकाणू समिती गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नाशिकमधील रुक्मिणी लाॅन्स येथे रविवारी (दि. १८) झालेल्या राज्यस्तरीय नियाेजन बैठकीत घेण्यात अाला. येत्या १३ जुलै राेजी काेपर्डी येथे बलात्कारपीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कँडल मार्च काढण्यात येणार आहे. याच वेळी मुंबईतील माेर्चासंबंधी नियाेजन बैठक घेण्याचे नाशिकमध्ये ठरवण्यात अाले.  
 
बैठक तब्बल पाच तास चालली. नाशिकसह मुंबई, ठाणे, अाैरंगाबाद, अकाेला, अमरावती, नागपूर अादी परिसरातून क्रांती माेर्चाच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला. हा माेर्चा काेणत्याही जातीच्या वा धर्माच्या विराेधात नसून अापल्या न्याय्य मागण्यांसाठी अाहे, असे संयाेजकांच्या वतीने प्रारंभी स्पष्ट करण्यात अाले. प्रारंभी काेपर्डी येथील बलात्कारपीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली. या वेळी नाशिकचे प्रतिनिधी अॅड. शिवाजी सहाणे, मुंबईचे दिलीप जगताप, नवी मुंबईचे मिलिंद सूर्यराव, अरुण पवार, केदार सूर्यवंशी, ठाण्याचे संताेष घाेडेराव, राजेंद्र काेंडरे, डाॅ. अभय पाटील, अमरावतीचे नितीन पलीकर, नगरचे बाळासाहेब पवार, जळगावचे भीमराव मराठे, सचिन साेमवंशी, अॅड. साेनवणे, जगन्नाथ काकडे अादींनी विचार व्यक्त केले.  
 
राणीचा बाग ते अाझाद मैदान मार्गावर माेर्चा   
येत्या ९ अाॅगस्ट राेजी काढण्यात येणारा माेर्चा सकाळी ११ वाजता मुंबईतील राणीच्या बाग ते अाझाद मैदान या मार्गावरून निघणार अाहे. या वेळी रस्त्याची एका बाजूची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात अाले. या मोर्चासाठी अधिक सूक्ष्म नियाेजनाची गरज व्यक्त करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...