आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात अन्यायाविरोधात पंधरा लाख मराठ्यांचा हुंकार, कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काेपर्डी प्रकरणातील अाराेपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजास आरक्षण मिळावे, अॅट्राॅसिटी कायदा रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी शिस्त अाणि नियोजनाचा अादर्श घालून देणाऱ्या लाखाे मराठा समाजबांधवांनी शनिवारी नाशिक येथे अतिविराट मूकमाेर्चा काढला. माेर्चाचा तब्बल सहा किलाेमीटरहून अधिक अंतराचा मार्ग अफाट गर्दीने फुलून गेला हाेता. दरम्यान, या माेर्चात ४० लाख मराठा बांधवांनी सहभाग नोंदवल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र, पोलिसांच्या मते हा आकडा १५ लाखांच्या घरात होता. महत्त्वाची बाब म्हणजे माेर्चात अपेक्षेनुसार माेठ्या संख्येने महिला, तरुणी अाणि शालेय विद्यार्थिनी सहभागी झाल्या हाेत्या. विशेष म्हणजे काेणत्याही माेर्चाच्या अग्रभागी दिसणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचे अस्तित्व या माेर्चात जाणवले नाही. सहा तास चाललेल्या माेर्चाची सांगता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शांततेत झाली.

गेल्या २० दिवसांपासून शहरात मराठा क्रांती माेर्चाचे नियाेजन सुरू हाेते. नियाेजनाप्रमाणे माेर्चाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहर भगवेमय झाले हाेते. शनिवारी सकाळपासूनच शहरातील रस्त्यांवर भगवे झेंडे अाणि महामूक मोर्चाचे स्टिकर लावलेले दुचाकी तसेच चारचाकी वाहने धावत होती. ७ वाजल्यापासून जिल्ह्यातून नागरिकांची गर्दी वाढत गेली. संयोजकांनी लोकप्रतिनिधींना मोर्चाच्या अग्रभागी राहू नका, अशी सूचना केल्याने जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह अन्य लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्यांनीही या सूचनेचे पालन केले. काेपर्डी येथील घटनेचा निषेध करण्यासाठी बहुसंख्य माेर्चेकऱ्यांनी काळे वस्त्र परिधान केले हाेते. तसेच ‘मराठ्यांच्या एकीसाठी, तुमच्या-अामच्या लेकींसाठी, एकत्र चला, अन्यायाला ठाेका’, ‘मानाने वागवाल तर लाखाचे एक हाेऊ, अपमानाने वागवाल तर एकाचे लाख हाेऊ,’ अशी घाेषवाक्ये माेर्चकऱ्यांच्या फलकांवर दिसत हाेती. मराठा समाजाचा मोर्चा हा केवळ दलितांच्या विरोधात नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जात हाेता. माेर्चा काेणतीही जात, धर्म, राजकीय पक्ष यांविराेधातही नाही, असे सांगितले जात हाेते. स्वामीनारायण मंदिरासमाेरून निघालेल्या या माेर्चाचा अाडगाव नाका, काट्या मारुती पाेलिस चाैकी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, टिळक पथ, महात्मा गांधी राेड, जिल्हाधिकारी कार्यालय असे मार्गक्रमण करत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाजवळ समाराेप झाला.

नराधमांना जनतेसमोर गोळ्या घाला- उदयनराजे भोसले
कोपर्डीतील बलात्कार ही छत्रपती शिवाजींच्या स्वराज्याला काळीमा आहे. त्या नराधमांना जाहीर फाशी द्या. नराधमांना लोकांसमोर गोळ्या घाला, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

मराठा मोर्चा हो कोणत्याही जातीच्या विरोधात नसल्याचे मोर्चाचा समारोप झाल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेेत सांगितले. पीडीत कुटुंबांना त्वरीत न्याय मिळत नसल्याने लोकांचा सरकारांवरचा, पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे, असे उदयनराजे म्हणाले.

सामाजिक समतोलासाठी कायद्यात बदल गरजेचा...
देशातील सामाजिक समतोल बिघडला आहे. हा समतोल टिकवण्यासाठी कायद्यात बदल करा, अशी मागणी यावेळी उदयनराजेंनी केली. सध्या तरी मराठ्यांंचे मूकमोर्चे काढले जात आहे. परिस्थिति बिघडली तर उद्रेक होईल. लीबिया, सीरिया सारखी परिस्थिती देशात व्हायला वेळ लागणार नाही. पक्षपेक्षा देशाचा विचार करा, असा सल्ला देखील दिला आहे.
हेही वाचाः CM चे डोके फुटेल की पवारांची लॉटरी लागेल, वाचा मराठा मोर्चाचे संभाव्य राजकीय परिणाम
हेही वाचा: मराठ्यांनी 'अहमद'नगर केले काबिज, डौलात फडकले भगवे,पीडितेचे वडील सहभागी

राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, भाजप आमदार डॉ. अपूर्व हिरे, सीमा हिरे, शिवसेना आमदार अनिल कदम, योगेश घोलप असे राजकीय नेतेही या मोर्चात सहभागी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या मोर्चात कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांंनीही हजेरी लावली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांंच्या मुलांचा मुंंडण करून मोर्चात सहभाग...
महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले मोर्चात सहभागी झाली असून त्या मुलांनी कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून मुुंंडण केले आहे.
हेही वाचाः क्‍लिक करुन जाणून घ्‍या, कोणत्‍या शहरात कधी आहे मोर्चा..
हेही वाचाः नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे फोटो..

तपोवन परिसरात मराठा क्रांती मूक मोर्चासाठी मराठा समाजबांधव पहाटेपासून जमण्यास सुरुवात झाली होती. निफाड, सिन्नर, दिंडोरी मालेगाव, नांदगाव, इगतपुरी आदि विविध तालुक्यातून मोर्चेकरी दाखल झाले आहेत. क्रांती मोर्चाच्या निमित्ताने जमलेल्या नागरिकांच्या हातात निषेध फलक दिसत आहेत. शाळकरी विद्यार्थी ते तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठांपर्यंत मोठ्या संंख्येने मोर्चात सहभाग घेतला आहे.

महापाैर अशाेक मुर्तडक मराठा क्रांती माेर्चामध्ये सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या यंत्रणेला अादेश देत माेर्चाचे प्रारंभ स्थळ असलेली तपाेवनातील जागा, माेर्चाचा मार्ग अाणि माेर्चाची सांगता हाेणार असलेल्या अनंत कान्हेरे मैदानाच्या स्वच्छतेचे अादेश दिले होते. तपाेवनात पडलेले बांधकाम साहित्य गाेळा करून ती जागा माेकळी करण्यात अाली होती.

हेही वाचाः अकोला, लातूर, जालन्‍यात एकवटले 46 लाख मराठा बांधव
हेही वाचाः हिंगोलीत नजर जाईल तिकडे मराठा, नजर जाईल तिथे भगवा, पाहा photos

बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून शहरातील वाहतूक नियोजनात बदल करण्यात आला आहे. अवजड वाहनांसाठी आणि शहरातील वाहनांसाठी पर्यायी मार्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. नो व्हेइकल झोन आणि पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे.

हेही वाचाः या 13 नियमांचे पालन करुनच, मराठा क्रांती मोर्चात सहभागी होता येईल
हेही वाचाः जालन्‍याच्‍या मोर्चात एकवटले 20 लाख मराठा बांधव

मराठा समाजाचा महामोर्चात सुमारे वीस लाख मराठा बांधव या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाहतूक नियोजनाचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता शहरात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग सुरू राहणार आहे. पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, गंगापूररोड, औरंगाबादरोड, अंबड या परिसरातील नागरिकांसाठी पर्यायी मार्ग सुरू राहणार आहे. मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग आणि पार्किंग स्थळ निश्चित करण्यात आले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, तिढा अखेर सुटला... शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर...प्राथमिक अंदाजासाठी ‘लिटमस टेस्ट’...शहरात येण्यासाठी या मार्गाचा करा अवलंब... आणि मोर्चाचा व्हिडिओ आणि फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...