आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती महामाेर्चा १५ लाखांचा, अायाेजन समितीचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काेपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ येत्या २४ सप्टेंबर राेजी काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती माेर्चाला जिल्हाभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, माेर्चात तब्बल १५ लाखांपेक्षा अधिक समाजबांधव सहभागी हाेतील, असा दावा नियाेजन समितीच्या वतीने रविवारी (दि. १८) पत्रकार परिषदेत करण्यात अाला. यापूर्वीच्या नियाेजनानुसार माेर्चाचा समाराेप जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हाेणार हाेता. परंतु, संभाव्य गर्दी लक्षात घेता समाराेपाचे स्थळ बदलून अाता गाेल्फ क्लब मैदानावर समाराेप हाेणार असल्याचे यावेळी सांगण्यात अाले.
येत्या २४ सप्टेंबर राेजी सकाळी १० वाजता तपाेवन येथून मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मूक महामाेर्चा काढण्यात येणार अाहे. या माेर्चातील उपस्थिती वाढविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून, रविवारी सर्वत्र बैठका घेण्यात अाल्या. तसेच, माेर्चा नियाेजन समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येऊन भूमिका विशद करण्यात अाली. यावेळी माजी अामदार माणिकराव काेकाटे यांनी सांगितले की, या माेर्चाचे नेतृत्व काेणताही राजकीय पुढारी करणार नसून, मराठा समाजाचा नागरिकच त्यासाठी पुढाकार घेत अाहेत. हा माेर्चा काेणतीही जात, धर्म, समाज वा पक्षाच्या विराेधात नाही, तर अॅट्रॉसिटी कायद्यामुळे मराठा समाजाला अाजवर सहन कराव्या लागलेल्या अन्यायाच्या विराेधात अाहे. या कायद्याच्या विराेधातील अनेक वर्षांपासूनची खदखद यानिमित्ताने व्यक्त होईल. इतर अनेक समाजबांधवांनी माेर्चाला पाठिंबा दिला अाहे. त्यांनाही अॅट्राॅसिटी कायद्याचा फटका बसला अाहे. त्यामुळे या माेर्चानंतर अॅट्राॅसिटीच्या कायद्यात किमानपक्षी सुधारणा तरी करावी, अशी अामची मागणी अाहे. हा मूकमाेर्चा संयमाने अाणि शिस्तीने काढण्यात येणार अाहे. जिल्हाभरात या माेर्चाच्या नियाेजनाच्या बैठका हाेत असून, या बैठकांना मिळणारा प्रतिसाद बघता १५ लाखांपेक्षा अधिक समाजबांधव भगिनी माेर्चात सहभागी हाेतील असा अंदाज अाहे, असेही काेकाटे म्हणाले. िजल्हाधिकारी कार्यालयाजवळ समाराेप केल्यास एकाच ठिकाणी गर्दी हाेऊन गाेंधळ हाेण्याची शक्यता असल्याने गाेल्फ क्लब मैदानावर समाराेप करण्याचा निर्णय घेण्यात अाल्याचेही सांगण्यात अाले. यावेळी खासदार हेमंत गाेडसे, अामदार जयवंत जाधव, अामदार सीमा हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे, डाॅ. शाेभा बच्छाव, माजी महापाैर प्रकाश मते, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख विजय करंजकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, नगरसेवक दिनकर पाटील, उद्धव निमसे, ज्ञानेश्वर गायकवाड, करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप अादी उपस्थित हाेते.

मराठा क्रांती महामाेर्चा १५ लाखांचा
प्रयत्न केले जात असून, रविवारी सर्वत्र बैठका घेण्यात अाल्या. तसेच, माेर्चा नियाेजन समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येऊन भूमिका विशद करण्यात अाली. यावेळी माजी अामदार माणिकराव काेकाटे यांनी सांगितले की, या माेर्चाचे नेतृत्व काेणताही राजकीय पुढारी करणार नसून, मराठा समाजाचा नागरिकच त्यासाठी पुढाकार घेत अाहेत. हा माेर्चा काेणतीही जात, धर्म, समाज वा पक्षाच्या विराेधात नाही, तर अॅट्रॉसिटी कायद्यामुळे मराठा समाजाला अाजवर सहन कराव्या लागलेल्या अन्यायाच्या विराेधात अाहे. या कायद्याच्या विराेधातील अनेक वर्षांपासूनची खदखद या निमित्ताने व्यक्त हाेणार अाहे. इतर अनेक समाजबांधवांनी या माेर्चाला पाठिंबा दिला अाहे. त्यांना देखील अॅट्राॅसिटी कायद्याचा फटका बसला अाहे. त्यामुळे असंताेष व्यक्त करण्यासाठी माेर्चाला पाठिंबा मिळत अाहे. या माेर्चानंतर अॅट्राॅसिटीच्या कायद्यात किमानपक्षी सुधारणा तरी करावी, अशी अामची मागणी अाहे. हा मूकमाेर्चा संयमाने अाणि शिस्तीने काढण्यात येणार अाहे. जिल्हाभरात या माेर्चाच्या नियाेजनाच्या बैठका हाेत असून, या बैठकांना मिळणारा प्रतिसाद बघता १५ लाखांपेक्षा अधिक समाजबांधव अाणि भगिनी या माेर्चात सहभागी हाेतील असा अामचा अंदाज अाहे, असेही काेकाटे यांनी सांगितले. िजल्हाधिकारी कार्यालयाजवळ समाराेप केल्यास एकाच ठिकाणी गर्दी हाेऊन गाेंधळ हाेण्याची शक्यता अाहे. त्यामुळे गाेल्फ क्लब मैदानावर माेर्चाचा समाराेप करण्याचा निर्णय घेण्यात अाल्याचेही सांगण्यात अाले. यावेळी खासदार हेमंत गाेडसे, अामदार जयवंत जाधव, अामदार सीमा हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे, डाॅ. शाेभा बच्छाव, माजी महापाैर प्रकाश मते, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख विजय करंजकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, नगरसेवक दिनकर पाटील, उद्धव निमसे, ज्ञानेश्वर गायकवाड, करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप अादी उपस्थित हाेते.

माेर्चाचा मार्ग
तपाेवनातील स्वामीनारायण मंदिरासमाेरून माेर्चाला सुरुवात हाेईल. तेथून अाडगाव नाका, काट्या मारुती पाेलिस चाैकी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, टिळक पथ, महात्मा गांधी राेड, जिल्हाधिकारी कार्यालय असे मार्गक्रमण करीत माेर्चाचा समाराेप गाेल्फ क्लब मैदानावर हाेईल.

{ संसरी भगूर येथील बैठकीत मोर्चासाठी सूचनांसह चर्चा
{ मराठी उद्योजकांचेही मदतीसाठी िनयोजन
{ मराठी क्रांती मूक मोर्चाची अभ्ूतपूर्व तयारी

असा असेल माेर्चातील क्रम
माेर्चात अग्रभागी मुली, विद्यार्थी अाणि महिला असतील. त्यानंतर वकील, डाॅक्टर, प्राध्यापक, शिक्षक अन्य प्रतिष्ठित व्यक्ती त्यानंतर सर्वसामान्य नागरिक असतील. सर्वात शेवटच्या भागात राजकीय मंडळी असतील. एकही राजकीय पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात चमकाेगिरी करण्यासाठी जाणार नाही.

केवळ पाण्याची व्यवस्था
नियाेजन समितीच्या वतीने माेर्चात केवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार अाहे. त्यामळे माेर्चेकरींनी घरूनच जेवण करून यावे किंवा टिफीन घेऊन यावे. तसेच, पिण्याची बाटली देखील ठेवावी, असे अावाहन समितीच्या वतीने करण्यात अाले अाहे.

परतीसाठी देखील वाहनव्यवस्था
माेर्चात सहभागी हाेण्यासाठी जिल्हाभरातून वाहनांची व्यवस्था करण्यात अाली अाहे. तपाेवनाजवळ वाहन व्यवस्था करण्यात अालीच अाहे, शिवाय बाहेरून जाेडल्या जाणाऱ्या रस्त्यांजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात अाली. याशिवाय, गाेल्फ क्लबपासून जवळपास असलेल्या माेकळ्या जागांमध्येही वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असून, जेणेकरून माेर्चेकऱ्यांना तपाेवनातील अापल्या वाहनांपर्यंत जाण्यास अडचण उद््भवणार नाही.
माेर्चासंदर्भातील पत्रकार परिषदेत बाेलताना माजी अामदार माणिकराव काेकाटे. समवेत विजय करंजकर, प्रकाश मते, अामदार सीमा हिरे, खासदार हेमंत गाेडसे, अामदार जयवंत जाधव, राजाराम पानगव्हाणे, करण गायकर, गणेश कदम, सुनील बागुल, दिनकर पाटील, अजय बाेरस्ते.

मुलीच करतील माेर्चाचे प्रतिनिधित्व
महामाेर्चाचे प्रतिनिधित्व जिल्ह्यातील पाच मुलींना देण्याचा निर्णय माेर्चा अायाेजन समितीच्या वतीने घेण्यात अाला. या मुली जिल्हाधिकाऱ्यांना माेर्चेकऱ्यांचे निवेदन सादर करणार असून, त्यातील एक मुलगी माेर्चासमाेर निवेदनाचे वाचन करणार अाहे. माेर्चातील शेवटच्या माणसापर्यंत हे निवेदन एेकू जाण्यासाठी साखळी पद्धतीची ध्वनी व्यवस्था करण्यात येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...