आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामाेर्चामुळे शहरवासीयांसाठी पर्यायी मार्ग, पाेलिस यंत्रणा सज्ज; नाे व्हेइकल झाेन जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठाक्रांती महामोर्चा बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शनिवारी (दि. २४) होणाऱ्या या महामोर्चासाठी शहरातील वाहतूक नियोजनात बदल करण्यात आला आहे. अवजड वाहनांसाठी आणि शहरातील वाहनांसाठी पर्यायी मार्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. नो व्हेइकल झोन आणि पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मराठा समाजाचा महामाेर्चा शनिवारी होत आहे. सुमारे वीस लाख मराठा बांधव या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली आहे. वाहतूक नियोजनाचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता शहरात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग सुरू राहणार आहे. पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, गंगापूररोड, औरंगाबादरोड, अंबड या परिसरातील नागरिकांसाठी पर्यायी मार्ग सुरू राहणार आहे. मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग आणि पार्किंग स्थळ निश्चित करण्यात आले आहे.
शहरातयेण्यासाठी या मार्गाचा करा अवलंब : आडगाव,पंचवटीतील वाहने अमृतधाम येथून तारवालानगर, शरदचंद्र मार्केट, मखमलाबाद, ड्रीम कॅसल सिग्नल, चोपडा लॉन्स, गंगापूर नाकामार्गे इच्छितस्थळी जातील. नाशिकरोडकडे जाणारी वाहने जत्रा हॉटेल, नांदूरनाका, जेलरोडमार्गे इच्छित ठिकाणी जातील. अंबड परिसरातील वाहने साईनाथनगर, जॉगिंग ट्रॅकमार्गे सिटी सेंटर मॉलमार्गे इतरत्र जातील.

प्राथमिक अंदाजासाठी ‘लिटमस टेस्ट’
दरम्यान,कुंभथाॅनने सर्वच गर्दी या पट्टीत नाेंदवली जाणार नाही, असेही स्पष्ट केले अाहे. मराठा माेर्चासाठी जिल्हाभरातून लाेक येणार असून, त्यातील सर्वच लाेक माेर्चाच्या रस्त्यावरून जातील असे नाही. काही गाेल्फ क्लब वा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परस्पर जाण्याची शक्यता अाहे. याव्यतिरिक्त लाखाेंच्या संख्येने लाेक येण्याची शक्यता लक्षात घेत पर्यायी मार्गांचाही वापर हाेणार असल्यामुळे कुंभथाॅन गर्दीचा ठाेस अाकडा देऊ शकणार नाही या मर्यादेकडेही लक्ष वेधले. केवळ गर्दीचा प्राथमिक अंदाज ठरवण्यासाठी ‘लिटमट टेस्ट’ म्हणून प्रयाेग केला जात अाहे.

तपाेवनातील स्वामीनारायण मंदिरासमाेरून माेर्चाला सुरुवात हाेईल. तेथून अाडगाव नाका, काट्या मारुती पाेलिस चाैकी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, टिळक पथ, महात्मा गांधी राेड, जिल्हाधिकारी कार्यालय असे मार्गक्रमण करीत माेर्चाचा समाराेप गाेल्फ क्लब मैदानावर हाेईल.
महापाैर अशाेक मुर्तडक मराठा क्रांती माेर्चामध्ये सहभागी हाेणार अाहेत. त्याचप्रमाणे त्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या यंत्रणेला अादेश देत माेर्चाचे प्रारंभ स्थळ असलेली तपाेवनातील जागा, माेर्चाचा मार्ग अाणि माेर्चाची सांगता हाेणार असलेल्या अनंत कान्हेरे मैदानाच्या स्वच्छतेचे अादेश दिले. तपाेवनात पडलेले बांधकाम साहित्य गाेळा करून ती जागा माेकळी करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...