आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वाजता निवेदन वाचन... नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे केले सुपुर्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तपोवनातून निघालेला मोर्चा गोल्फ क्लब येथे पोहोचताच निवेदन देण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सहा मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. बरोबर वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमाेर निवेदन वाचण्यास साक्षी चव्हाण या युवतीने सुरुवात करत आपल्या मोजक्याच मागण्याही मान्य करण्याची विनंती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली. तृप्ती कासार, रुचिका ढिकले, ऋतुजा लोणे, प्रगती पगार, काजल गुंजाळ या युवतींनी वाजून मिनिटांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सुपुर्द केले.
कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर निघत असलेल्या मोर्चांचा भाग म्हणून शनिवारी नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात नाशिककर मराठा समाजाच्या युवतींचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना कंठच दाटून आला. ऑगस्टला गांधीजींनी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा देत देश सोडण्यास भाग पाडले होते. शनिवारच्या मराठा समाजाच्या या विराट मूकमोर्चाद्वारे महिलांवरील अत्याचाराला कायमचे ‘चले जाव’चा नारा देत असल्याचे सांगत या युवतींनी प्रत्येक माय-भगिनीने मी एकटी नाही, तर तिच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज उभा आहे हा संदेश देत अत्याचार सहन करता त्याचा प्रतिकार करण्याचा सल्ला दिला. १३ जुलै २०१६ रोजी अहमदनगरच्या कोपर्डी गावात शाळकरी मुलीवर झालेला अत्याचार ही समाजाला काळिमा फासणारी घटना असून, यातील नराधमांना मरेपर्यंत फाशी देण्याची प्रमुख मागणी यावेळी करत आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याची कळकळीची विनंती केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रशासन तुमच्या पाठीशी असून, मागण्या आजच शासनाला सादर करणार असल्याचे अश्वासित केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार बबन काकडे, सी. एस. देशमुख अादी उपस्थित हाेते.

युवती सकाळी वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयात
मुख्य मराठा क्रांती मूक महामोर्चास पंचवटीतील तपोवनातून प्रारंभ झाला. मात्र, निवेदन देणाऱ्या युवतींना जिल्हाधिकारी कार्यालयातच थांबविण्यात आले. सकाळी वाजेपासूनच निवेदन देणाऱ्या सहा युवतींनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाण मांडले होते. प्रथम त्या स्टेट बँकेच्या ट्रेजरी शाखेत बसल्या होत्या. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांनी या युवतींना आणि त्यांना घेऊन आलेल्या त्यांच्या माता आणि महिला स्वयंसेवकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात त्यांची बसण्याची व्यवस्था करून दिली. तत्पूर्वी मोर्चा तपोवनातून निघण्यापूर्वीच या युवतींनी हुतात्मा स्मारकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादनही केले.

निवेदनावर युवतींच्याच स्वाक्षऱ्या
मराठाक्रांती मूक महामाेर्चाच्या शिस्तबद्ध मोर्चाची शिस्त निवेदनावरही दिसून आली. कुठल्याही राजकीय नेत्याची किंवा कार्यकर्ते स्वयंसेवकांची नावे टाकता अकरा युवतींची नावे आणि स्वाक्षऱ्यांचेच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. रुचा पाटील, मयूरी पिंगळे, दिव्या महाले, रसिका शिंदे, सई वाघचौरे, चेतना आहेर, दिव्या साळुंके, गायत्री मगर, ऋतुजा दिघे, श्वेता भामरे, पल्लवी फडोळ या युवतींची नावे निवेदनावर नमूद करण्यात आली होती.
{कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींवर संघटितपणे शारीरिक आणि लैंगिक अत्याचार, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा आरोप निश्चित करून निर्भया कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी.
{राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे या प्रकरणाची जलदगती न्यायप्रक्रिया त्वरित सुरू करून सहा महिन्यांत गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी.
{अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा. या कायद्याचा दुरुपयोग खोट्या केसेस दाखल करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
{मराठ्यांना आरक्षण द्यावे.
{शेतकऱ्यांच्या शेतमालाला कायमस्वरूपी हमीभाव देण्यात यावा.
{छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्यात यावी.
{छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात एका वर्षाच्या आत पूर्ण करावे.
बातम्या आणखी आहेत...