आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा जळजळीत निषेध, भगव्यातून अंगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काळे वस्त्र परिधान केलेले माेर्चेकरी... निषेधाच्या काळ्या फिती लावलेले तरुण - तरुणी... पाच किलाेमीटरहून अधिक अंतर थांबता पार करणारे अाबालवृद्ध, शिवाजी महाराज अाणि जिजाऊ यांचा पेहराव केलेले चिमुरडे अन् माेर्चाच्या मार्गातील केरकचरा उचलणारे स्वच्छतादूत अशा शिस्तबद्ध पद्धतीने भारावलेल्या वातावरणात शहरातून मराठा क्रांती माेर्चा काढण्यात अाला. हा मूकमाेर्चा असला तरीही माेर्चेकऱ्यांनी विविध फलकांवरील घाेषवाक्याच्या माध्यमातून अापल्या भावना व्यक्त केल्या. माेर्चाला गालबाेट लागेल अशी काेणतीही घटना घडू देण्याची काळजी यावेळी माेर्चेकऱ्यांसह संयाेजकांनी घेतली. दरम्यान, माेर्चाच्या निमित्त संपूर्ण शहर भगवेमय झाले हाेते. ठिकठिकाणी भगवे ध्वज घेतलेले अाणि काळे वस्त्र परिधान केलेले दुचाकीस्वार तरुण दिसत हाेते.
तपाेवनातून सकाळी निघालेल्या या माेर्चात लाखाेंच्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले हाेते. सकाळपासूनच माेर्चात सहभागी हाेण्यासाठी समाजबांधवांची लगबग सुरू हाेती.
माेर्चापर्यंत पाेहोचण्यासाठी वाहन व्यवस्था हाेती. तसेच, अनेक अाबालवृद्ध माेर्चापर्यंत पायीदेखील येताना दिसत हाेते. यात महिला अाणि तरुणींची संख्या लक्षणीय हाेती. अतिशय गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर हा माेर्चा काढण्यात अाल्याचे भान प्रत्येक माेर्चेकरी राखत हाेता. त्यामुळे संपूर्ण माेर्चाला अतिशय गंभीर स्वरूप अाले हाेते. माेर्चादरम्यान काेणी फारसे सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला नाही. माेर्चाच्या अग्रभागी महिला, विद्यार्थिनी, त्यानंतर प्रतिष्ठित नागरिक अाणि सर्वात शेवटी राजकारणी हाेते.अनंत कान्हेरे मैदान झाले भगवेमय : हुतात्माअनंत कान्हेरे मैदानावर माेर्चाचा समाराेप झाला. माेर्चाच्या अग्रभागी असलेल्या महिला गाेल्फ क्लबवर प्रथम पाेहोचल्या. त्यामुळे संपूर्ण कान्हेरे मैदानावर भगवे ध्वज घेतलेल्या महिलाच दिसत हाेत्या. यावेळी चेतना अाहेर या विद्यार्थिनीने सांगितले की माैन अाहे म्हणून अाम्हाला गाैण समजू नका. जगातील प्रमुख सात अाक्रमक समाजांत मराठ्यांचा समावेश असल्याची अाठवणही तिने करून दिली. प्रतीक्षा शिंदे म्हणाली की, मराठ्यांच्याच नव्हे, तर काेणत्याही जातीच्या मुलीकडे वर डाेळे करून पाहणाऱ्याचे डाेळे काढा. मराठा समाज केवळ अारक्षण नसल्यामुळे मागे राहिलेला अाहे. अाम्ही बुद्धिमान असूनही अजूनही मातीतच अडकून बसलाे अाहाेत. रुचा पाटील म्हणाली की, अाम्ही अश्रू हाेऊन रडत नाही, तर शस्त्र घेऊन लढत अाहाेत. सैराट संस्कृतीच्या झिंगाट विकृतीवर ताल धरून नाचणाऱ्यांना अाता तरी शरम वाटायला हवी. पल्लवी फडाेळ हिने सांगितले की, काेपर्डीतील घटना ही राज्यातील अाता शेवटचीच घटना ठरावी. मराठा समाजाला अारक्षण द्यावे तसेच अॅट्राॅसिटीचा कायदादेखील रद्द करावा. दिया तांबेने नमूद केले की, शिवबांनी अाम्हाला सुरक्षितता दिली, पण ही सुरक्षितता अाता संपुष्टात अाल्याचे चित्र अाहे. काेपर्डीसारखी घटना पुढे घडूच नये या दृष्टीने कायदा तयार व्हावा. मयूरी पिंगळे म्हणाली की, एकत्र यायला कुठल्याही नेत्याची पक्षाची गरज भासत नाही हे मराठा समाजाने दाखवून दिले अाहे. अंकिता अाहेर या विद्यार्थिनीनेही मनाेगत व्यक्त केले. श्वेता सुरेश भामरे या विद्यार्थिनीने निवेदनाचे वाचन करून दाखविले. घटनेचे गांभीर्य अाेळखून काेणत्याही मनाेगताप्रसंगी उपस्थितांनी टाळ्या वाजवू नये असे सांगितले जात हाेते या सूचनेचे काटेकाेरपणे पालनही केले.

तिच्या हुंदक्याने हेलावले कान्हेरे मैदान
जिच्याशेतकरी अाई-वडिलांनी अात्महत्या केलेली अाहे, त्या जनाकृष्णा चाैधरीने पाणावलेल्या डाेळ्यांनी केलेले मनाेगत सुन्न करणारे ठरले. दुष्काळ अाणि नापिकीमुळे अापल्या अाई-वडिलांनी अात्महत्या केल्याचे सांगत अाता अापल्याला अाधाराश्रमात राहावे लागत असल्याचे ती म्हणाली. तुम्ही मराठा शेतकऱ्याला जगविण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनवणी तिने सरकारला कळकळीने केली. अाकांक्षा पगार या विद्यार्थिनीने सादर केलेल्या ‘बाबा जहर नकाे खाऊ’ या कवितेनेदेखील उपस्थितांचे डाेळे पाणावले.

महिलांसाठी स्वतंत्र मार्ग
मेहेर सिग्नल येथे महिला आणि पुरुषांची एकाच ठिकाणी गर्दी झाल्याने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी हुतात्मा स्मारकाच्या बाजूने महिलांसाठी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूने पुरुषांना मार्गस्थ केले.
माेर्चातील शिस्त, पाेलिस निर्धास्त
मराठा बांधवांची शिस्त आणि पोलिसांचा बारा तासांपासून एकाच जागेवर खडा पहारा यामुळे मराठा क्रांती मोर्चा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडता निर्विघ्नपणे पार पडला. मोर्चात सहभागी झालेल्या लाखो बांधवांमध्ये महिला बच्चेकंपनीचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने प्रारंभीपासूनच तणावात असलेले पोलिस शिस्त बघून निर्धास्त झाल्याचे दृश्य शहरात बघावयास मिळाले. पोलिस प्रशासनाने केलेले सुयोग्य बंदोबस्त नियोजन आणि लाखोंच्या संख्येने सहभागी झालेले मराठा बांधव आणि माता भगिनींनी दाखवलेल्या संयमाने हा एेतिहासिक मोर्चा यशस्वी पार पाडण्यास पोलिस प्रशासनास यश आले.

मराठा क्रांती मोर्चासाठी पोलिस प्रशासनाने आठ दिवसांपासून नियोजन केले होते. शुक्रवारी मोर्चाच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम करण्यात आली. शनिवारी सकाळी वाजता पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहाटे वाजेपासून मोर्चाची वाहने येण्यास सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत वाहनांचा राबता सुरूच होता. सर्वाधिक वाहने धुळे बाजूकडून आल्याने निलगिरी बाग परिसरातील पार्किंग जागाही कमी पडली. मोर्चा वाहनांना पुढे जाण्यास जागा नसल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. ही रांग थेट आडगाव मेडिकल फाटापर्यंत गेल्याने मोर्चेकऱ्यांनी पायीच मोर्चामध्ये सहभागी झाले.

पोलिसांची पायी गस्त : मोर्चामध्येपोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांच्यासह उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, सचिन गोरे यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी पायी गस्त केली.
गर्दीअभावीरस्त्यांवर मोर्चा थबकला : तपोवनापासूनसुरू झालेला मोर्चा निमाणी चौक ते सांगली बँक सिग्नलपर्यंत वाढत गेला. अखेर पोलिसांनी निमाणी, पेठ नाका, रामवाडी पूल , घारपुरे घाटमार्गे मोर्चाला मार्ग करून दिला.

त्र्यंबक रोड ते पंचवटी कारंजा होल्ड : गोल्फकल्ब मैदान फुल्ल झाल्याने मोर्चा त्र्यंबकरोड, सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय, मेहेर, एम. जी. रोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजापर्यंत मराठा बांधव रस्त्यावर थांबून राहिले होते.

मोर्चाचीसांगता आणि रेटारेटी : मोर्चास्थळीजाण्यास मिळाल्याने रस्त्यावर एकाच ठिकाणी सुमारे दीड तास बसून राहणाऱ्या महिला आणि लहान मुले राष्ट्रगीत झाल्यानंतर उठून उभे राहिले. पार्किंग ठिकाणी जाण्यासाठी गर्दी झाल्याने रेटारेटी झाली. पोलिस आणि स्वयंसेवकांनी महिलांना प्रथम मार्ग करून दिला.

दोन महिलांना भोवळ : गर्दीतदोन महिलांचा जीव गुदमरल्याने त्यांना भोवळ आली. पोलिसांनी दोन्ही महिलांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केले. काही मुलांसह वृद्ध महिलांना चक्कर आल्याने पोलिसांनी त्यांना बसण्यासाठी जागा करून दिली.

पोलिस आयुक्तांकडून अभिनंदन : मोर्चायशस्वी पार पाडणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी बिनतारी संदेश यंत्रणेवर अभिनंदन केले. सायंकाळी पाच वाजता बंदोबस्त स्थगित करण्यात आला.

महामार्गबंद : महामार्गावरभगवे झेंडे लावलेल्या वाहनांची संख्या सर्वाधिक असल्याने इतर वाहनांची संख्या तुरळक होती. मोर्चात वाहनांची संख्या वाढल्याने निलगिरी बाग पार्किंगची जागा अपुरी पडली. महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्याने ही रांग थेट मेडिकल फाटापर्यंत गेली.
बातम्या आणखी आहेत...