आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांकडेच धरला निवेदन स्वीकारण्याचा अाग्रह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात २४ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे निवेदन स्विकारण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी गोल्फ क्लब मैदान येथे येण्याचा आग्रह मराठा समाजाच्या सर्वच राजकीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धरला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी त्यास नकार दिल्याने या मुद्यावरुन मराठा समाजाच्या आलेल्या शिष्टमंडळांतील नेत्यांची बाचाबाची झाल्याने याबाबत नंतर काय ते कळविण्याचे अाश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र मोर्चातील प्रत्येक घटनेची जबाबदारी ही प्रशासनाप्रमानेच सभागृहात उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांवरराहाणार असल्याचे सांगत त्यांच्यावरच ती निश्चित केली.
राज्यभर निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातही शनिवारी भव्य मोर्चा काढला जाणार आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा अाहे. शिवाय आमच्या घरातील मुले-मुलीही स्वयंस्फुर्तीने यात सहभागी होणार आहे. त्यामुळे नाशिकमधील मोर्चातील सहभागींची संख्या ही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत २० ते २५ टक्के अधिक असेल. त्यामुळे शनिवार सुटीचा दिवस असला तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:च निवेदन घेण्यासाठी यावे, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कुठलेही अश्वासन दिले नसल्याने लागलीच नेत्यांनी निवेदने घेण्यासाठी विधानभवनाबाहेर मंत्री येतात. अधिवेशनातून मुख्यमंत्री येतात. त्यातुलनेत हा मोर्चा मोठाच असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीच ते स्विकारण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आले. शिवाय दालनाबाहेर येऊन ते स्विकारण्याचीही काहींनी मागणी करताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. मात्र, निवेदन स्विकारण्यास कोण येणार याबाबत मोर्चापुर्वीच कळविण्याचे या नेत्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले.

दरम्यान , मोर्चाचे केलेले नियोजन, वाहनतळ, मोर्चाचा मार्ग, वेळ , ठिकाण आणि त्याचे स्वरुप अशी सर्वच माहिती या शिष्टमंडळाने दिली. ती सर्व जाणून घेतल्यानंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अालेल्या या राजकीय नेत्यांना इतर जिल्ह्यात निघालेल्या मोर्चांचा अादर्श सांगत त्यानुसारचा शांततेत मोर्चा काढावा, अशा सूचना तुमच्या स्वयंसेवकांना द्याव्यात, कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचीही काळजी घेण्याचे आवाहन केले.

तसेच, घडलेल्या प्रकाराला संबधित नेते मोर्चेकरीच जबाबदार असतील असे सांगत जबाबदारी त्यांच्यावरच निश्चित करत शांततेत मोर्चा काढण्याचा जणू इशाराचा दिला. त्यावर शिष्टमंडळातील राजकीय नेत्यांनीही शांततेत मोर्चाचे अाश्वासन दिले. बैठकीस खासदार हेमंत गोडसे, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, मविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, उध्दव निमसे, अामदार अनिल कदम, दिलीप बनकर, शिरीष कोतवाल, माणिकराव कोकाटे, गोकुळ पिंगळे, डॉ. दिनेश बच्छाव, केदा आहेर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रांत उदय किसवे, जिल्हा परिषदेचे सुशिल वाघचौरे उपस्थित होते.

{ पेठ- हरसूल-गिरणारे कडून येणा-या वाहाने शरदचंद्र मार्केट येथेच पार्क केली जातील.
{ कळवण -दिंडोरी कडून येणारी वाहने जुने मार्केट यार्ड या ठिकाणी अडविण्यात येतील.
{ मालेगावच्या दिशेने येणारी वाहने रुक्मिणी लॉन्स, औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग, मनपा पाण्याची टाकी, डाळींब मार्केट येथे पार्क करता येतील.
{ निफाड-येवला -नांदगाव कडून येणारी वाहाने जेजुरकर मळ्यात पार्क केली जातील.
{ त्र्यंबककडून येणारी वाहाने पपाया नर्सरीकडून मुंबई आग्रा महामार्गाकडे वळविली जाणार असून, पुढील मार्गानेही एबीबी सर्कलवरुन सिटीसेंटर मॉलमार्गे मुंबई आग्रा महामार्गावरुन तपोवन रस्त्याने आठवण लॉन्स शेजारील चव्हाण मळ्यात पार्क केली जातील. तर इगतपुरीची वाहने याच मार्गाने सरळ आणत चव्हाण मळ्यातच पार्क केली जातील.
{ सिन्नर- भगुर- देवळाली कडून पुणे रस्त्याने येणारी वाहाने गोदावरी नदीच्या दक्षिण बाजीचे पटांगणात पार्क केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...