आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात दहा ‘नो व्हेइकल झोन’ जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शनिवारी(दि. २४) काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चासाठी होणारी अफाट गर्दी लक्षात घेऊन वाहतूक विभागाने ‘नो व्हेइकल झोन’ जाहीर केला आहे. मोर्चा निघणाऱ्या मार्गावरील परिसरात हा लागू करण्यात येणार आहे. स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉइंट, निमाणी बसस्टँड परिसर, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, सीबीएस परिसर, टिळकवाडी, तिडके कॉलनी ते महामार्ग, मुंबई नाका टॅक्सी स्टँड, सारडा सर्कल या दहा ठिकाणी ‘नो व्हेइकल झोन’ असणार आहेत.
मोर्चाच्या िदवशी नाशिक शहरांतर्गत फिरू इच्छिणाऱ्या वाहनचालकांची अाणि नाशिकमार्गे अन्य शहरांकडे जाणाऱ्या बाहेरगावच्या वाहनचालकांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून पोलिस अाणि वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे. मोर्चात १५ ते २० लाख मराठा समाजबांधव सहभागी होणार असल्याचा अंदाज नियोजन समितीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. राज्यभरातील मोर्चांना झालेली गर्दी लक्षात घेऊन नाशिकमध्ये ‘नो व्हेइकल झोन’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहराबाहेरीलवाहनांसाठी मार्ग पान
{आडगाव, पंचवटी विभागातील वाहने : अमृतधाम चौफुली येथून उजवीकडे वळण घेऊन तारवालानगर, शरदचंद्र पवार मार्केट सिग्नल, मखमलाबाद गाव टी पॉइंट, चोपडा लॉन्स, गंगापूरनाकामार्गे इच्छित स्थळी. नाशिकरोडकडे जाणारी वाहने जत्रा हॉटेल, नांदूरनाका, जेलरोडमार्गे पुढे.
बातम्या आणखी आहेत...