आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा माेर्चासाठी वैद्यकीय सेवा अन् पाण्याची व्यवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्ये येत्या शनिवारी (दि. २४) मराठा क्रांती महामोर्चा काढण्यात येणार असून, यासाठी जिल्हाभरातील १५ ते २० लाख समाजबांधव सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाभरातील माध्यमिक शाळांनी आपल्या अधिकारातील सुटी घोषित करावी, त्याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पत्रकाद्वारे दिल्या आहेत.
कोपर्डीप्रकरणी नाशिकमध्ये शनिवारी काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक जिल्हाभरातून येण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने परिपत्रक काढून मुख्याध्यापकांनी आपल्या अधिकारातील सुट्यांचे नियोजन करून शाळांना सुटी जाहीर करण्याची परवानगी दिली अाहे. त्यामुळे जिल्हाभरातील ९९८ शाळांना सुटी राहील, अशी माहिती शिक्षणाधिकारी नवनाथ आैताडे यांनी दिली. वार्षिक सुट्यांच्या नियोजनामध्ये एकूण कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठासमाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी अत्याचारप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात सुधारणा व्हावी, अशा विविध मागण्यांसाठी शनिवारी (दि. २४) नाशिकमध्ये काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली अाहे. तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे गोल्फ क्लब येथे मोर्चाची सांगता होणार असल्याने या मार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक, लाऊडस्पीकरची व्यवस्था आणि ठिकठिकाणी भगवे झेंडे फलक लावले जात आहे. मराठा क्रांती मूक मोर्चा असल्याने मार्गावर दोन्ही बाजूला स्वयंसेवक उपस्थित राहतील. तसेच, आरोग्य बूथ, रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक, पाण्याची व्यवस्था असे नियोजन करण्यात आले आहेत.

राज्यभरात सध्या मराठा क्रांती महामोर्चे काढले जात आहेत. लाखोंच्या संख्येने सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून कोपर्डीच्या घटनेचा निषेध नोंदवत असून, विविध मागण्या शांततेच्या मार्गाने मांडत आहे. प्रत्येक मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने आता सर्वांचेच लक्ष नाशिकच्या मोर्चाकडे लागले आहे. नाशिक शहर जिल्ह्यात मोर्चाच्या नियोजनासाठी बैठकांचे सत्र सुरू असून लाखोंच्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केेले जात आहे. तसेच, ठिकठिकाणी जनजागरण रॅली काढली जात असून मोर्चाची माहिती दिली जात आहे.
रुग्णवाहिका,डॉक्टरांचे पथक मदतीसाठी तैनात : तपोवनते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर निघणाऱ्या मोर्चासाठी दर ५०० मीटर आरोग्य बूथ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णवाहिका डॉक्टरांचे पथक मदतीसाठी असतील.

गाड्यांवरस्टीकर, भगवे झेंडे अन् सोशल मिडियावरही मोर्चाची चर्चा : मराठाक्रांती मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून, शहरासह जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाची चर्चा सुरू झाली आहे. दुचाकींसह मोठ्या गाड्यांवर मराठा क्रांती मोर्चाचे स्टीकर लावण्यात आले आहेत. तसेच, भगवे झेंड्यांनी शहर भगवेमय झाले आहे. व्हॉट्स अॅप, फेसबूक यांसारख्या सोशल मीडीयावरही केवळ मोर्चाची चर्चा सुरू आहे.

मराठामोर्चेकऱ्यांच्या परतीसाठी बस सज्ज
शनिवारीनाशिकमध्ये निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्यांच्या परतीसाठी एस. टी. महामंडळाने विविध ठिकाणांहून बसची व्यवस्था केली आहे. ही सेवा सशुल्क राहणार असून, त्यामुळे मोर्चेकरांना परतीसाठी आपली वाहने पार्क केलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठीची पायपीट टळणार आहे.

राज्यभर निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये लाखोेंच्या संख्येने लोक सहभागी होत आहेत. ही संख्या प्रत्येक जिल्ह्यातील मोर्चागणिक वाढत आहे. नाशिकमध्येही जवळपास हा आकडा २० लाखावर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोर्चाच्या सुरुवातीला एक एकने येणारे मोर्चेकरी परतताना मात्र लाखोंच्या संख्येने राहाणार असल्याने त्यांच्या परतीसाठी वाहानांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठीच एस. टी. महामंडळाने बसची व्यवस्था केली आहे. त्याचा योग्य उपयोग मोर्चेकरांनी करावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रक
महामंडळाच्या वतीने अगदी सुटसुटीत नियोजन करण्यात आले आहे. मात्र तरीही येणाऱ्या प्रवाशांसह मोर्चेकरांना कुठलिही अडचण आली तर त्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती केली आहे. द्वारका चौक, मीनाताई ठाकरे स्टेडियम, मायको सर्कल आणि बिटको चौक येथे वाहतूक नियंत्रक असतील.

सकाळी वाजेपासून असेल शहर बससेवा
मोर्चासकाळी १० वाजेनंतर सुरू होईल. त्यामुळे त्यापुर्वी प्रवाशी तसेच मोर्चेकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी सकाळी वाजेपासून मोर्चा सुरू होईपर्यंत एस. टी. ने स्वतंत्र नियोजन करत प्रवाशांना बससेवा उपलब्ध करुन दिली आहे.
अशीअसेल सेवा : {नाशिकरोड ते तपोवन मार्गे नांदूर नाका {नाशिकरोड ते द्वारका मार्गे पुणारोड {भगूर ते द्वारकामार्गे पुणारोड {श्रमिकनगर ते मायको सर्कल {उत्तमनगर ते मायको सर्कल {ओझर ते तपोवन
गैरसोय टाळण्यासाठी विशेष नियोजन
^मोर्चेकरांचीगैरसोयहोऊ नये यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे. मात्र, ही सेवा मोफत नसून, त्यासाठी भाडे आकारले जाणार आहे. -यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ
{ साक्री-नंदूरबारकडून पुण्याकडे जाणाऱ्या बसेस उड्डाण पुलावरुन उतरुन पुणे हायवेने नाशिकरोडमार्गे जातील.
{ अहमदनगर ते सेलवासकडे जाणाऱ्या बसेस नाशिकरोड, पाथर्डीरोडमार्गे अंबड लिंकरोडने त्र्यंबकेश्वरकडे जातील.
{ मुंबईकडून धुळेकडे जाणाऱ्या बसेस महामार्ग बसस्थानकावरुन द्वारका उड्डाण पुलावरुन मार्गस्थ होतील.
{ पुणे मार्गाकडे जाणाऱ्या सर्व बसेस महामार्ग बसस्थानकावरुन सुटतील.
{ डोंगरे वसतीगृह येथून ओझर, मालेगाव, सटाणा, पेठ,कळवण, पिंपळगांव, मनमाड, नांदगाव आणि येवल्याला जाणाऱ्या बसेस चोपडा लॉन्स रासबिहारीमार्गे सोडण्यात येणार आहेत.
{ मुंबई, पुणे या ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच, धुळे मार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळ बसेस थांबविण्यात येतील.
अशी असेल परतीची शहर बससेवा :
{ शहर बसेसद्वारे आलेल्या मोर्चेकरांना महामार्ग बस स्थानकावरुन तपोवन, सिन्नर, नाशिकरोड, ओझर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी बसेसची व्यवस्था असेल.
{ मायको सर्कल आणि डोंगरे वसतीगृह येथून श्रमिकनगर, उत्तमनगर, गिरणारे या मार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसची सुविधा असेल.

असा असेल महामोर्चा
१० हजार : स्वयंसेवक राहणार
५० : रुग्णवाहिका
७० : डॉक्टरांची पथके
७० स्टॉल्स : पाच लाख पाण्याचे पाऊच
लाख : मराठा क्रांतीचे स्टिकर्स
लाख : भगवे झेंडे पाट्या

राज्यभरात ठिकठिकाणी निघालेल्या अतिविशाल मराठा मुक्ती माेर्चांच्या यशात साेशल मीडियावर दणक्यात झालेल्या प्रचाराचा माेठा वाटा अाहे. मग नाशिकमधील माेर्चासंदर्भात संवाद साधण्यात उपयुक्त ठरलेल्या माेबाइललाही मुक्ती माेर्चाच्या कव्हरने वेढले तर त्यात
नवल ते काय?

मराठा माेर्चानंतर वाचण्यात येणारे निवेदन शहरात सर्वत्र एेकू जाण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक लावण्यात येत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...