आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागृती फलकावरील तिचा अाक्राेश नक्की काय सांगताे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठा क्रांती माेर्चाच्या जागृतीचे फलक शहरात ठिकठिकाणी लागले अाहेत. नाशिकच नव्हे तर ज्या-ज्या ठिकाणी क्रांती माेर्चे झाले अाहेत, तेथे हाच फलक लावला जाताे. या फलकावर झळकणारी मुलगी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय अाहे. ती काेण अाहे, कुठली अाहे याची उत्सुकता सर्वांनाच अाहे, परंतु ती काय सांगतेय यावरदेखील विचारविनिमय सुरू अाहे. ‘दिव्य मराठी’ने शहरातील काही महिला अाणि मुलींशी चर्चा करून ती काय सांगतेय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘गेल्या अनेक वर्षांपासून मनात दडवून ठेवलेली खदखद जेव्हा एकदा बाहेर पडते तेव्हाची तिची अवस्था या छायाचित्रातून व्यक्त हाेते’ असा सूर जवळपास सर्वांनीच या फलकाच्या बाबतीत अाळवला.
या सहनशीलतेचा बांध फुटू शकताे
^काेपर्डीतील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाजातील प्रत्येक तरुणीच्या मनात असलेल्या भावनांचे प्रातिनिधिक स्वरूप फलकावरील तरुणीच्या रूपातून दर्शविण्यात अाले अाहे. यापुढे अाम्ही अन्याय सहन करणार नाही हे सरकारपर्यंत अाम्ही या फलकाच्या माध्यमातून पाेहोचवत अाहाेत. मराठा समाजाचे रक्त सळसळते अाहे, पण मूकमाेर्चातून ताे सहनशीलतेचाही संदेश देत अाहे. परंतु, मागण्यांवर विचार झाल्यास सहनशीलतेचा बांध अशा रीतीने फुटू शकताे हेदेखील फलकातून दाखविण्यात अाले अाहे. अॅड.स्वाती नखाते (प्रातिनिधिक प्रतिक्रिया)
या चर्चेतून बाहेर पडलेले हे मुद्दे
{हा मराठा समाजाच्या सर्वसामान्य मुलीचा, जिजाऊच्या लेकीचा अाक्राेश अाहे. अापल्या भगिनीवर झालेल्या अत्याचाराने ती कमालीची व्यथित झालेली अाहे. अत्याचार हाेत असताना त्या अबलेला किती वेदना, यातना सहन कराव्या लागल्या असतील या विचाराने ती क्राेधीत झाली अाहे. असे पाशवी कृत्य करणाऱ्यांना तातडीने फाशीचीच शिक्षा द्या, अशी ती पाेटतिडकीने मागणी करतेय. या घटनेतील दाेषींचा निषेध करण्यासाठी तिने काळा पेहराव केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...