आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - पंधरा दिवस सर्वेक्षण करून सरकारने मराठा आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली. पण सर्व माहिती सरकारकडे आहेच. बापट समितीचाही अहवाल आहे. असे असतानाही केवळ 15 दिवसांत सर्वेक्षण करून आरक्षण देणे हा मराठय़ांचा अपमानच आहे. एकीकडे न्यायालयात न टिकणारा अहवाल व दुसरीकडे केवळ तोंडी आश्वासन, अशी दुटप्पी भूमिका केवळ निवडणुका डोळय़ासमोर ठेवूनच करण्यात आल्याची टीका भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.
छावा संघटनेच्या मराठा आरक्षणाच्या अधिवेशनात त्यांनी सरकारचा समाचार घेतला. निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्री आश्वासनांची खैरात वाटत असल्याने आता त्यांचा ‘लकवा’ दूर झाला का? असा टोलाही त्यांनी लगावला. ‘आघाडी सरकारने आरक्षण दिले नाही तरीही मराठा समाजाने घाबरून न जाता केवळ सहा महिन्यांची वाट पाहा. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही ते नक्कीच देऊ,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.