आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maratha Rezartion Issue At Nashik, Divya Maratrhi

मराठा नेते म्हणतात, देर आये-दुरुस्त आये! विविध संघटनांकडूनही निर्णयाचे स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठा आणि मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. त्यामुळे गुरुवारपासून राज्यात शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरतीत मराठा समाजाला 16, तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण लागू झाले आहे. या निर्णयाचे मराठा समाजाच्या विविध संघटना आणि नेत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. ‘देर आये, दुरुस्त आये’ अशी प्रतिक्रिया या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे समाजातील आर्थिक दुर्बलांना लाभ होईल, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.
कष्टक-यांना ठरणार उपयुक्त
आत्महत्या केलेल्या शेतक-यांपैकी 80 टक्के शेतकरी मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरजच होती. ‘देर आये, दुरुस्त आये’ यासंदर्भातील याचिका उच्च् न्यायालयात दाखल झाल्यास राज्य सरकारने सक्षम वकील द्यावेत.
नितीन भोसले, आमदार

उशिरा मिळाला न्याय
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे होते. परंतु, राज्यकर्त्यांनी लक्ष दिले नाही. उशिरा का होईना सरकारने या समाजाला न्याय दिला, याबद्दल आम्ही आभार मानतो.
हरिभाऊ शेलार, माजी नगराध्यक्ष

वंचित घटकांना लाभ
शैक्षणिक आणि नोक-यांच्या बाबतीत वंचित मराठा समाजाला या आरक्षणामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मराठा सेवा संघातर्फे आरक्षणासंदर्भातही मागणी करण्यात आली होती. आरक्षण परिषदही घेण्यात आली होती. -हंसराज वडघुले, जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ

अंमलबजावणी व्हावी
मराठा समाजाला आरक्षण मिळाले ही स्वागतार्ह बाब आहे. यासाठीच्या विविध आंदोलनांचेच हे फलित असून, या आरक्षणाचा लाभ समाजातील कष्टकरी, मध्यमवर्गीय व गरीब घटकांनाच मिळावा.
आशिष हिरे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय छावा संघटना

ख-या लढाईस प्रारंभ
मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणावर ज्या वेळी न्यायालयही शिक्कामोर्तब करेल, त्याच वेळी समाजाने जल्लोष करणे गरजेचे आहे. आरक्षणाची ही लढाई आता ख-या अर्थाने सुरूझाली आहे.
योगेश निसाळ, जिल्हाप्रमुख, संभाजी ब्रिगेड
आर्थिक दुर्बलांना लाभ
गरीब आणि श्रीमंत यांमधील दरी मिटविण्यासाठी हे आरक्षण उपयुक्त ठरणार आहे. या आरक्षणाचा फायदा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना होणार आहे. त्यातून समाजाचा सर्वांगीण विकास होईल. -माधुरी भदाणे, जिल्हाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड