आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुखंडांची अमेरिकेची वारी पाण्यावरून वादाच्या गर्तेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाडा विरुद्ध नाशिक-नगर यांच्यातील पाण्याच्या वादामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच कुंभमेळा यशस्वी करणाऱ्या पालकमंत्र्यांसह प्रशासकीय मुखंडांची अमेरिका वारी वादाच्या गर्तेत सापडण्याचे संकेत मिळत अाहेत. उच्च न्यायालयाच्या अादेशानुसार शुक्रवारी पाणी साेडण्याचा निर्णय घेणे भाग पडले तर, संभाव्य पेच प्रसंगाला प्रमुख अधिकाऱ्याशिवाय कसे ताेंड द्यायचे, या भीतीने दुय्यम फळीतील अधिकाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले अाहे. विशेषत: दरवर्षी अाॅक्टाेबरमध्ये क्रमप्राप्त असलेली धरणांतील पाणी अारक्षणाची बैठकही लांबणीवर पडली तर हा प्रश्न अाॅक्टाेबरहिट इतकाच तापण्याची चिन्हे अाहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी नियाेजन केल्यामुळे मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांपासून तर प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत, सत्कार यथाेचितच हाेते. तीन महिने रात्र अाणि िदवस एक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यामुळे त्यांचा शीण दूर हाेईल, उमेद वाढेल नेहमीच तणावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाचे काैतुक हाेईल, यात काेणाचेही दुमत नाही. याच परिस्थितीत अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट अाॅफ टेक्नाॅलाॅजी (एमअायटी) मीडिया लॅब (केंब्रिज) या संस्थांनी यशस्वी नियाेजन करणाऱ्या सर्वांचेच काैतुक करीत त्यांना बाेस्टन येथे कुंभथाॅन परिषदेसाठी अामंत्रित केल्यामुळे हा अायाेजनाच्या शिरपेचात खाेवला गेलेला मानाचा तुराच मानला जात अाहे.

या दाैऱ्यासाठी जाण्यास मुख्यमंत्र्यांनी व्यस्त कार्यक्रमामुळे नकार देत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर धुरा साेपवली त्यांच्या नेतृत्वाखाली अाता महापाैर, उपमहापाैर, अामदार, विभागीय अायुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका अायुक्त, पाेलिस अायुक्तांसह प्रमुख अधिकाऱ्यांची टीमही अमेरिकावारीच्या तयारीत व्यस्त झाली अाहे. हा दाैरा ज्यावेळी जाहीर झाला, त्यावेळी राजकीय वा सामाजिक पटलावर शांततेचे वातावरण असल्यामुळे काेणाचीही हरकत अाली नाही. मात्र, हा दाैरा ताेंडावर असतानाच पाण्यावरून मराठवाडा विरुद्ध नाशिक नगर असा वाद उभा राहिला. अाता तर या वादामुळे थेट कायदा सुव्यवस्थाच धाेक्यात येईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर मग दुसऱ्या फळीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले. शुक्रवारी २३ अाॅक्टाेबर राेजी पाणी साेडण्याबाबत न्यायालयाकडून निर्णय हाेण्याची दाट शक्यता अाहे. सद्यस्थितीत नाशिकमधून पाण्याचा एक थेंबही साेडू देणार नाही, अशी भूमिका घेत भाजपाव्यतिरिक्त सर्वच पक्षाचे पदाधिकारी राजकीय जाेडे बाजूला ठेवून एकत्र अाले अाहेत. काही प्रमाणात स्थानिक म्हणून नागरिकही पाणी देण्याच्या निर्णयाविराेधात अाहेत. अशा परिस्थितीत मराठवाड्याला पाणी साेडण्याची वेळ अालीच, तर कायदा सुव्यवस्थेपासून सर्वच परिस्थिती हाताळण्यासाठी निर्णय प्रक्रियेतील मुखंडांची उपस्थिती अावश्यक असणार अाहे. मात्र, शुक्रवारी निर्णय हाेत असतानाच शनिवारपासून अमेरिका दाैऱ्यासाठी प्रमुख मुखंड रवाना झाले, तर काेणाच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य परिस्थिती हाताळायची, असा पेच अधिकाऱ्यांना पडला अाहे. शुक्रवारी न्यायालयाने या प्रकरणावर काही दिवसांकरिता स्थगिती दिली, तर नशीबच चांगले, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या अाहेत. मराठवाड्यास पाणी देण्यासंदर्भात पोलिस, महसूल पाटबंधारे विभागांची बैठक झाली. त्याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पोलिस अधीक्षक संजय मोहिते आदी.

1. साधारणपणे अाॅक्टाेबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्याचे पाणी अारक्षण पालकमंत्री करतात. प्रत्यक्षात यंदा पाण्यावरून वाद सुरू असताना किंबहुना दुर्भिक्ष असताना अाॅक्टाेबरमध्ये पाणी अारक्षणाची बैठक हाेईल अशी शक्यता दिसत नाही. गुरुवारी दसऱ्याची सुटी, शुक्रवारी पाण्यावर निकाल शनिवारी अमेरिका दाैऱ्यासाठी प्रमुख मुखंड रवाना हाेतील. हे सर्वजण ३० अाॅक्टाेबर राेजी परतणार अाहेत. अशा परिस्थितीत नाेव्हेंबर महिन्याचा पहिला अाठवडा बैठकीसाठी उजाडेल.

2. शुक्रवारी लगेचच पाणी साेडण्याचे अादेश दिले गेले, तर साेडल्या जाणाऱ्या पाण्याच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील पाणी नियाेजन बदलणे गरजेचे ठरणार अाहे. जसे महापालिकेसाठी गतवर्षीप्रमाणे हजार दशलक्ष घनफूट पाणी अारक्षित असेल गंगापूर धरण समूहातून पाणी साेडल्यास प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी पाणी उरत असेल, तर त्यादृष्टीने महापालिका क्षेत्र अन्य अवलंबून असणाऱ्या संस्थांसाठी कसे नियाेजन करायचे, यासाठी डिसीजन मेकर अर्थातच निर्णय घेणाऱ्यांची गरज भासणार अाहे.